भारत बाजार विकास पॅनल च्या निवडणूक संपर्क कार्यालयाचे उदघाटन ; मोठ्या संख्येत सदस्यांनी उपस्थिती दर्शवून शिवाजी चव्हाण यांच्या कार्याची दिली पोच पावती ; सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडणून देण्याचे आवाहन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.८  

 छत्रपती संभाजीनगर |  भारत बाजार वाणिज्य संकुल सहकारी संस्था मर्या. छत्रपती संभाजी नगर च्या संचालक मंडळाची २०२३ ते २०२८ या वर्षासाठी शुक्रवारी, (दि. १३) निवडणूक होणार असून भारत बाजार विकास पॅनल च्या निवडणूक  संपर्क कार्यालयाचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने या निवडणूक संपर्क कार्यालयात आपली उत्स्पुर्तपणे उपस्थिती दर्शविल्याने पॅनल प्रमुख शिवाजी चव्हाण शिवाजी चव्हाण यांनी गेल्या १३ वर्षात केलेल्या प्रामाणिक कामाची पोच पावती यातून दिली असून भारत बाजार विकास पॅनलच विजयाचा गुलाल गुलाल उधळणार असा ठाम निर्धार यावेळी उपस्थितांनी एकजुटीने व्यक्त केला.

याप्रसंगी माजी उपमहापौर राजू शिंदे, रामराव शेळके, अनुराधा चव्हाण, संजय पाटील चौधरी, मार्गदर्शक ए.आर. जोशी, प्रकाश गोठी, श्यामसुंदर बियाणी, महेश वाझे,  पॅनल प्रमुख शिवाजी चव्हाण, ॲड राधेश्याम इंदाणी यांची उपस्थिती होती. भारत बाजार च्या सर्वांगीण विकासासाठी भारत बाजार विकास पॅनल चे १३ उमेदवार कपबशी या निवडणूक चिन्हावर हि निवडणूक लढत असून पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी बोलतांना केले. तर  रामराव शेळके म्हणाले कि, मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती संभाजी नगर च्या भारत बाजार ची एक वेगळी व्यावसायिक ओळख आहे. इथे येणारा प्रत्येक ग्राहक आगामी काळात समाधानाने आपले काम करून संतुष्ट होईल यासाठी भारत बाजार विकास पॅनल च्याच उमेदवारांना आपले मत द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले. तर अनुराधा चव्हाण म्हणाल्या कि, या पॅनल मध्ये महिलांचाही सहभाग आहे त्यामुळे हे पॅनल निश्चित प्रचंड मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास व्यक्त करत सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तर पॅनल प्रमुख शिवाजी चव्हाण म्हणाले कि, २३८ सदस्य संख्या असलेल्या या संस्थेत एकूण २१५ मतदार आहे. या सर्वांचा कौल हा आमच्याच बाजूने असल्याने आमच्या पॅनल चा निश्चित विजय होईल. गेल्या १३ वर्षात भारत बाजार वाणिज्य व्यापारी संकुल साठी आम्ही प्रामाणिकपणे काम केले आहे. कोणत्याही सदस्याला कोणतीही अडचण आली तर आम्ही सर्वोतपरी मदतीचा हात दिला आहे. अर्ध्या रात्री वैद्यकीय मदतीसाठी आणि अत्यावश्यक सेवेसाठी सर्वच सदस्य तयार असतात. भारत बाजार व्यापारी संकुलाला राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही आगामी काळात काम करणार आहोत. भारत बाजार संकुलात कार पार्किंग, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, मोबाईल टॉवर, बिल्डींग वरील होर्डिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, उत्पन्नाचा श्रोत निर्माण करणे हे काम केले आहे. यामुळे भारत बाजार व्यापारी संकुलाचे उत्पन्न वाढविण्याचे काम विद्यमान संचालक मंडळाने केले असल्याने सर्व मतदारांनी आमच्या पॅनलवर विश्वास ठेवून आगामी काळात आणखी दर्जात्मक व सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती त्यांनी यावेळी बोलतांना केली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!