गरुडझेप मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात ३२२ रक्त संकलन ; प्रजासत्ताकदिनी अभिनव उपक्रम

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२७
छत्रपती संभाजीनगर |मुकुंदवाडी परिसरातील गरुडझेप मित्र मंडळाच्या वतीने गरुडझेप चौक , मुकुंदवाडी येथे मागील १५ वर्षापासून प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यावर्षी तब्बल ३२२ रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रम नोंदविल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष किशोर अण्णा ठुबे पा. यांनी दिली. शिबिराचे उद्घाटन काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरास मान्यवरांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून मार्गदर्शन केले. यामध्ये कॅबिनेट राज्यमंत्री अतुल सावे, पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, ब्रम्हा गिरी, गौतम पातारे, पोलीस उपनिरीक्षक जयराम धनवई, माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप, मोतीलाल जगताप , बाबासाहेब डांगे, कमलाकर जगताप, रामचंद्र नरोटे, ज्ञानेश्वर डांगे, पप्पूराज ठुबे, सुनील जगताप, किसन ठुबे, दीपक खोतकर यांची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष किशोर ठुबे पा., उपाध्यक्ष सुनील बडसल, प्रशांत कोचर, प्रा.पी.एम.वाघ, संदीप शिंदे, सुनील कोल्हे, दत्ता बोडखे, योगेश खोतकर, स्वप्निल वाघमारे, अजय शिंदे, आकाश ठोंबरे, प्रदीप शिंदे, सतीश गायकवाड, आदींनी पुढाकार घेतला.