सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीवर बॅरेजेस उभारण्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार 

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१२  

सिल्लोड | तालुक्यातील पूर्णा नदीवर उभारण्यात येत असलेल्या बॅरेजेस संदर्भात महामहीम राज्यपालांची भेट घेवून पूर्णा नदीवर बॅरेजेस उभारण्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. दरम्यान सोयगाव प्रकल्पातून वाहून जाणारे पाणी जंगला तांडा धरणात वळविण्यासाठी ना. विखे पाटील यांनी मान्यता दिली. त्यासोबतच अजिंठा येथील निजाम कालीन बंधाऱ्याची दुरुस्ती व नवीन बंधारे उभारण्यासाठीचा प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांना सादर करावा यासाठी मंजुरी मिळवून देवू असे देखील ना. विखे पाटील म्हणाले. सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीवर उभारण्यात येणाऱ्या साखळी बंधाऱ्याच्या संदर्भात तसेच सिल्लोड – सोयगाव विधानसभा मतदारसंघातील आत्महत्याग्रस्त तालुक्यासाठी शेतीसाठी पर्याप्त सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी बुधवारी (दि.१२) मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी मंत्री तथा सिल्लोड विधानसभा मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.

याप्रसंगी झालेल्या बैठकीत ना. विखे पाटील बोलत होते. या बैठकीस जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपूर, सचिव डॉ. संजय बेलसरे, गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक  संतोष तिरमनवार, जलसंपदा छत्रपती संभाजी नगर विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, अधीक्षक अभियंता भारत शिंगारे, कार्यकारी अभियंता श्री. वानखेडे, उपविभागीय अभियंता शेख अशपाक आदींची उपस्थिती होती. या बैठकीत सिल्लोड – सोयगाव तालुक्यातील खेळणा, अजिंठा – अंधारी मध्यम प्रकल्प तसेच केळगाव, जंगला तांडा, वरखेडी, सोयगाव आणि देव्हारी प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती, अंदाजपत्रक व प्रस्ताव बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सिल्लोड – सोयगाव तालुके हे आत्महत्यागस्त तालुके असल्याने येथील शेतकरी दोन पिके घेणारा निर्माण व्हावा यासाठी  राज्य शासनाने  पूर्णा नदीवर बॅरेजेस उभारण्याच्या प्रकल्पाला ७ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या प्रकल्पाच्या कामाची निविदा संदर्भात मा. न्यायालयाने पुढील सुनावणी पर्यंत स्थगिती दिलेली आहे. सदर प्रकल्पास मान्यतेसाठी मा. राज्यपाल यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी च्या शासन पत्रांनव्ये मा. राज्यपाल यांची मान्यता आवश्यक आहे. यासाठी ना. विखे पाटील यांनी पुढाकार घ्यावा असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. यासंदर्भात ना. विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत आपण लवकरच मा. राज्यपालांची भेट घेवून हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावू असे म्हणाले.  शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने भराडी प्रकल्प महत्वाचा… आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने शासनाने भराडी ल.पा. तलाव या प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता रद्द करून त्याऐवजी 11 साखळी बंधाऱ्याच्या फेरनियोजनाचा प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या निर्णयानुसार पूर्णा नदीच्या पात्रात जवळपास ४२ किलोमीटर पाणी अडविल्या जाणार आहे. येथे उभारण्यात येणाऱ्या साखळी बंधाऱ्यांमुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होणार असून पीक उत्पादनासाठी शाश्वत सिंचनाची साधने उपलब्ध होतील. या बंधाऱ्यांमुळे  दुष्काळावर मात करण्यासाठी जलस्रोतांची मोठे बळकटीकरण होण्यास तसेच परिसरात भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होईल. शेतकरी आत्महत्याला आळा बसेल.

सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या अनुषंगाने पूर्णा नदीवर बॅरेजेस…  

– आमदार अब्दुल सत्तार, आमदार, सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघ, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर.

सिल्लोड हा आत्महत्याग्रस्त तालुका आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी येथील शेतकरी दोन पिके घेणारा निर्माण व्हावा यासाठी सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या अनुषंगाने पूर्णा नदीवर बॅरेजेस उभारण्याच्या प्रकल्पाला शासनाने मान्यता दिलेली आहे. यातील प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करू. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या भराडी प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!