कॅनॉट प्लेस मध्ये शुक्रवारी ‘रमाई पहाट’ मैफिलीचे आयोजन

सकाळी ६ ते ११ या वेळात कॅनॉट प्लेस येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.५   

छत्रपती संभाजीनगर : त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांचा ७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. त्यानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांतर्फे ‘रमाई पहाट’ ही अभिनव मैफल सिडकोतील कॅनॉट प्लेस येथे शुक्रवारी (दि.७)  आयोजित करण्यात आली आहे.

या संगीतमय अभिवादन कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कलावंत आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत. गीतगायन, वादन, कविता, ढोल, लेझिम, हलगी, फ्लॅश मॉब, रॅप, मल्लखांब डीजेंसह अनेक कलासादरीकरण एकाच ठिकाणी पाहण्याची पर्वणी शहरवासीयांना मिळणार आहे. ‘रमाई पहाट’ या अभिनव कार्यक्रमाचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून येत्या शुक्रवारी, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते ११ या वेळात कॅनॉट प्लेस येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसिद्ध गायक कुणाल वराळे, अजय देहाडे,चेतन चोपडे, सचिन भुईगळ, विजय पवार, अक्षय जाधव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!