मुख्यमंत्री म्हणाले नो खैरे ; ओन्ली भुमरे ; ही निवडणूक देशाच्या विकासाची प्रगतीची ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल ; शिवसेना महायुतीचे लोकसभा उमेदवार संदीपान भुमरे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२६  

छत्रपती संभाजीनगर | इथल्या जनतेने नेहमीच छत्रपती संभाजीनगर वर प्रेम केले आहे, धनुष्य बाणावर प्रेम केले आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर या शहरातील प्रत्येक नागरिकांची निष्ठा आहे. त्यामुळे ही निवडणूक कोण्या एकट्याची नसून देशाच्या विकासाची आहे. असे सांगत एकच पुकार, हिंदुत्व्वाचा जयजयकार अशी घोषणा देत नो खैरे ओन्ली भुमरे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित गुरुवारी (दि.२६) गुलमंडी येथे शिवसेना-महायुतीच्या आयोजित सभेत केले.

दहा वर्षात मोदींनी हिमालया एव्हढे काम केले आणि  काँग्रेस ने गेल्या साठ ते सत्तर वर्षात टेकडी एवढेही काम केले नाही असा निशाणा त्यांनी आपल्या भाषणातून काँग्रेस वर साधला. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी शिवसेना महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलमंडी येथे शिवसेना-महायुतीच्या आयोजित सभेत केले.

क्रांती चौक येथून भर उन्हात निघालेल्या भव्य  रॅलीने शक्तिप्रदर्शन करून पाहणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले.छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक शिवसेना-महायुतीचे अधिकृत उमेदवार संदिपान भुमरे यांनी आपला उमेदवारी अर्ज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. रॅली साठी तयार करण्यात आलेल्या विशेष रथात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना महायुतीचे लोकसभा उमेदवार संदीपान भुमरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेव दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, कृषीमंत्री दादा भुसे, अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार प्रशांत बंब, आमदार प्रा. रमेश बोरनारे, आमदार विक्रम काळे, आमदार नारायण कुचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, विजय औताडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख, मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर, जिल्हा सचिव अनिकेत निल्लावार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, वैभव मिटकर, महानगर प्रमुख बिपिन नाईक, रिपाई आठवले गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, माजी आमदार नितीन पाटील, माजी उपमाहापौर प्रमोद राठोड, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, भरत राजपूत, रमेश पवार, कन्नड शिवसेना तालुका प्रमुख केतन काजे, प्रहारचे सुधाकर शिंदे, शिवसेना संपर्क प्रमुख Add अमित गीते, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कटारे, भाजप महिला आघाडीच्या मनीषा मुंढे, राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला जिल्हाध्यक्षा स्वाती कोल्हे शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शिल्पाराणी वाडकर, हर्षदा शिरसाठ, ग्रामीण च्या पुष्पाताई गव्हाणे, सुलभा भोपळे, मनसे च्या महिला जिल्हाध्यक्ष लिला राजपूत, संजना जाधव, दिव्यां पाटील यांची उपस्थिती होती.

आई वेणूबाई यांनी केले लोकसभा उमेदवार संदीपान भुमरे  यांचे औक्षण

छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक शिवसेना-महायुतीचे अधिकृत उमेदवार संदिपान भुमरे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज गुरुवारी (दि.२५) महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल केला. क्रांती चौक येथून भव्य रॅलीने शक्तिप्रदर्शन करण्यात आले. अर्ज भरण्यापूर्वी आई वेणूबाई आसाराम भुमरे, पत्नी पुष्पा संदिपान भुमरे, सून वर्षा विलास भुमरे, यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी छाया राजू भुमरे नातू शिवांश विलास भुमरे,  विरांश विलास भुमरे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!