ग्लोबल आडगाव या बहुचर्चित मराठी चित्रपटाची अमेरिका अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ५   

 छत्रपती संभाजीनगर | सिल्वर ओक फिल्म्स व इंटरटेनमेंट प्रस्तुत, मनोज कदम निर्मित, अमृत मराठे सहनिर्मित आणि अनिलकुमार साळवे लिखित व दिग्दर्शित “ग्लोबल आडगाव” या मराठी चित्रपटाची निवड अमेरिकेतील न्युजर्सी मराठी अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे.\

“ग्लोबल आडगाव” हा मराठीतील एकमेव असा चित्रपट ठरला आहे कि, या चित्रपटाची सकारात्मक दखल जगभर घेतली जात आहे. हा चित्रपट कोलकत्ता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देशविदेशातील नामांकित लोकांनी पाहिला आणि उदंड प्रतिसाद दिला. हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुराग बसू, कांतारा चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक निरीक्षित देव तर परीक्षक साजीयन कडोनी यांनी चित्रपटाची बांधणी, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय तंत्रशुद्ध बांधणी आणि दिग्दर्शनाचे प्रचंड कौतुक केले. अमेरिकीत होणाऱ्या न्युजर्सी अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मराठी) येथे “ग्लोबल आडगाव” हा मराठी चित्रपट दाखविला जाणार आहे. या वेळी हॉलीवूड, बॉलीवूड मधील नामांकित दिग्दर्शक आपली हजेरी लावणार आहे. मराठीचे संगीत संस्कृती आणि उद्दिष्टे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसारित व्हावेत या उद्देशाने हा महोत्सव घेतला जातो. नवीन वर्षात जानेवारी महिन्या दरम्यान बिग सिनेमा, 1655 ओक थ्री रोड एडिसन, न्यु जर्सी 08820, युनायटेड स्टेट येथे होणार आहे.

अनिलकुमार साळवे यांनी यापूर्वी शिरमी व १५ ऑगस्ट या लघुपटाचे लेखन दिग्दर्शन केले होते. त्यांना नाट्यक्षेत्रातीत लेखनाबद्दल अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन रा.रा. दातार पुरस्कार मिळाला आहे. तर१५  ऑगस्ट लघुपटास लंडन येथील न्यूलीन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलचा  बेस्ट डिरेक्टर व बेस्ट फिल्म अवार्ड मिळाला आहे. १५ ऑगस्ट या लघुपटास भारतातील  सर्वांत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके, प्रभातचा व्ही शांताराम बेस्ट फिल्म डिरेक्टर अवार्ड. केरळ, दिल्ली, राजस्थान, बंगलोर यासह राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय ९१ पुरस्कार आहेत. लघुपटाच्या उदंड यशानंतर सिल्वर ओक फिल्म्स अँड इंटरटेनमेंट प्रस्तुत तर राष्ट्रीय उद्योजकतेचा पुरस्कार प्राप्त निर्माते मनोज कदम निर्मित, अमृत मराठे सहनिर्मित “ग्लोबल आडगाव” हा पूर्ण लांबीचा चित्रपट केला आहे. “ग्लोबल आडगाव” चित्रपटाचे दोन प्रिव्हू पुणे व मुंबईत झाले, समिक्षकांनी भरभरुन तारीफ केली. या चित्रपटात शेती मातीत राबणाऱ्या हातांचा समृद्ध संघर्ष आहे. उत्कंठावर्धक कथासूत्र, उपहासात्मक, मर्मभेदी संवाद, ग्रामीण माणसांच्या सजीव करणाऱ्या व्यक्तीरेखा, गावजीवनाचं भव्य उदात्त चित्रीकरण या चित्रपटात केले आहे. मराठवाड्यातील अस्सल भाषा म्हणी नैसर्गिक विनोद याने खुलणारे प्रसंग व आदर्श शिंदे, गणेश चंदनशिवे व जसराज जोशी यांनी गायलेल्या व विनायक पवार, प्रशांत मंडपुवार, अनिलकुमार साळवे यांनी लिहीलेल्या गाण्यांना समिक्षाकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. “ग्लोबल आडगाव” म्हणजे शेती मातीतल्या पिठ्यांची जीवधरणी घुसमट आहे. बेरकी व्यवस्थेच्या भिंतीना तडा देणारा क्रांतीचा संघर्ष म्हणजेच ग्लोबल आडगाव आहे.

या चित्रपटात अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, अनिल नगरकर, उपेन्द्र लिमये, रोनक लांडगे, अशोक कालगुडे, सिद्धी काळे, महेंद्र खिल्लारे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, साहेबराव पाटील, शिवकांता सुतार, विष्णु भारती, ऋषिकेश आव्हाड, परमेश्वर कोकाटे, अभिजीत मोरे,  विष्णु चौधरी, रामनाथ कातोरे, विक्रम त्रिभुवन यांच्या मुख्य भूमिका आहेत. इ.पी. प्रशांत जठार, प्रोडक्शन व्यवस्थापक सागर देशमुख, छायांकन गिरीश जांभळीकर, संगीत विजय गवंडे, साउंड विकास खंदारे, आर्ट संदिप इनामके, संकलन श्रीकांत चौधरी, डिआय दिशा रंगालय, मेकअप मंगेश  गायकवाड यांचे असून डॉ. सिद्धार्थ तायडे, प्रतिपदादा सोळंके, दिलीप वाघ, गणेश डुकरे, वैदेही कदम, स्नेहल कदम, गणेश लोहार, मंगेश तुसे, संतोष मोरे, यशपाल गुमलाडू, मधुकर कर्डक, प्रियांका सदावर्ते, प्राजक्ता खिस्ते, जगदिश गोल्हार, सुशील डायगव्हाणे, जितेंद्र सिरसाट, प्रभात तालखेडकर, अनुराधा प्रकाश, राहुल कांबळे, अक्षय गायकवाड, मनिष खंदारे, सचिन गेवराईकर, स्वप्नील खरात, अमृता मोरे, मयंक सिरसाठ, केरे महाराज, आदित्य केरे, प्रतिक्षा गोरे, अरुण गाडे, अभिजीत काटे, भगवान राउत, रुपेश पासफुल, ज्ञानेश्वर हरीमकर, डॉ. सतिश म्हस्के, प्रेरणा खरात, विद्या जोशी, रानबा गायकवाड, सागर पतंगे, व्यंकटेश कदम, अभिजीत कदम, नानासाहेब कर्डीले, रोहिदास मोरे, प्रकाश रणधीर, सोनल मर्चंडे, सुधीर श्रीराम, स्वप्नील काळे, डॉ ज्ञानेश्वरी उंडणगावकर, राजेश वाठोरे, योगेश लम्हने, सचिन कुलकर्णी, युवराज साळवे, सुदर्शन कदम, अरविंद हमदापूरकर फुलचंद नागटीळक, अमोल पानबुड़े, प्रकाश जावळे, प्रशांत जाधव चैताली  जाधव, अकांक्षा हमदापूरकर, साई महाशब्दे, आशीर्वाद नवघरे, प्राचार्य इंद्रभान डांगे, प्राचार्य प्रदिपदादा सोळुंके, अनिलजी गायकवाड, डॉ.अर्चना कदम, सोमनाथभाऊ मराठे, जानकिराम पाटील,चेतन महाजन, कैलास पाटील,त्र्यंबक पाटील बालकलाकार रुषभ लोहार यांच्या भूमीका आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!