युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे करणार आज शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी ; विरोधी पक्षनेते दानवे यांची माहिती

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.९
छत्रपती संभाजीनगर | युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे सोमवारी (दि. ०९) संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्ण संख्या, औषधांची मागणी,उपलब्ध साठा, रुग्णांकरिता सुविधा व रिक्त पदे याबाबत अधिष्ठाता यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पाहणी करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते,शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली.
०३ ऑक्टोंबर रोजी घाटी येथे आरोग्य सुविधा अभावी १४ रुग्ण एका दिवशी दगावलेच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही पाहणी भेट असणार आहे.सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी ते चिखलठाण विमानतळ येथे पोचणार असून ११ वाजता घाटीला जाणार आहेत.यासोबतच ते राज्यातील नांदेड व नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांची सुद्धा पाहणी करून अधिष्ठातांसोबत वैद्यकीय सुविधा बाबत चर्चा करणार आहेत..