पर्यावरण जनजागृतीपर फोटोथॉन २०२३ छायाचित्रण स्पर्धा नाशिकमध्ये ; इकोफोक्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ तर्फे स्पर्धेचे आयोजन ; तब्बल ३ लाख रुपयांची पारितोषिके ; छायाचित्रकारांनी सहभागी होण्याचे आवाहन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १४     

नाशिक | इकोफोक्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ तर्फे पर्यावरणप्रेमीं आणि छायाचित्रकारांसाठी अनोखी पर्वणी उपलब्ध होत आहे. पर्यावरणाचे जतन करीत त्याचे महत्त्व छायाचित्रांच्या माध्यमातून पटवून देण्यासाठी “फोटोथॉन २०२३” ही छायाचित्रण स्पर्धा नाशिकमध्ये होणार आहे. नेमून दिलेल्या अवघ्या २४ तासाच्या वेळेत लाईव्ह छायाचित्र काढून स्पर्धकांना स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे. शनिवार, दिनांक १७ जून रोजी सकाळी १०.३० वाजता, गंगापूर रोड, विद्याविकास चौकातील कुसुमाग्रज स्मारक, नाशिक येथे स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे असल्याची माहिती आयोजक परेश पिंपळे यांनी दिली.

स्पर्धेच्या दिवशी छायाचित्रकारांनी कुसुमाग्रज स्मारक येथे एकत्रित यायचे आहे. उद्घाटनानंतर २४ तासांमध्ये छायाचित्रकारांनी त्यांचे कौशल्य वापरुन पर्यावरणाशी संबंधित विविध छायाचित्रे टिपायची आहेत. आजच्या युगात जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल फोनमध्ये कॅमेरा आहे. या गोष्टीचा फायदा जर प्रत्येकाने पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचा विचार मांडण्यासाठी केला, तर या चळवळीला व्यापक जनसहभाग मिळेल. फोटो विथ मोटो हा विचार पर्यावरण चळवळीत मोठा बदल घडवेल आणि हेच फोटोथॉनचे वैशिष्टय आहे.

फोटो स्टोरी, नेचर, मोबाईल छायाचित्र आदी श्रेणीत पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. यंदा पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर या शहरांत स्पर्धा होत आहे. सर्व ठिकाणी मिळून एकूण सुमारे ३ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. यापूर्वी विविध सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी फोटोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

एक छायाचित्र हे १ हजार शब्दांचा अर्थ सांगते, त्यामुळे या विचाराने स्पर्धेची सुरुवात झाली. एखादे छायाचित्र सर्व बंधनांच्या पलिकडे जाऊन संवाद साधण्याचे परिणाम साधू शकते. त्यामुळे पर्यावरणाशी निगडीत विविध स्तरांवर चित्रांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न यामाध्यमातून छायाचित्रकार करणार आहेत. व्यावसायिक, शिकाऊ, नवोदित अशा १८ वर्षांवरील सर्व छायाचित्रकारांसाठी स्पर्धा खुली आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता मो. 9821194396 किंवा www.ecofolks.com या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!