कितीही साधने बदलली तरी पत्रकारितेचे महत्व कधीच कमी होणार नाही ; मराठी पत्रकार परिषदे चे विभागीय सचिव बालाजी सूर्यवंशी यांचे मत

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ६
छत्रपती संभाजीनगर | : मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्न, औरंगाबाद मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी शुक्रवारी (दि.६) अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विविध माध्यमातील प्रतिनिधी, पत्रकार, संपादक यांची उपस्थिती होती.
यावेळी औरंगाबाद मराठी पत्रकार परिषदे चे विभागीय सचिव बालाजी सूर्यवंशी म्हणाले की, मराठी पत्रकारानी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श अंगीकारावा, आजच्या युवा पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञान शिकून स्वाभिमानाने बदलत्या काळाची पत्रकारिता करावी. कितीही साधने बदलली तरी पत्रकारितेचे महत्व कधीच कमी होणार नाही. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आपण सर्वानी निस्वार्थ भूमिका निभावावि आणि पत्रकारितेचा स्तंभ आणखी मजबूत करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ सभागृहात आयोजित अभिवादन कार्यक्रमा प्रसंगी औरंगाबाद मराठी पत्रकार परिषदे चे विभागीय सचिव बालाजी सूर्यवंशी, परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुनीलचंद्र वाघमारे, सचिव कानीफ अन्नपूर्णे, एम.पी. जामनिक, स.सो. खंडाळकर, प्रसिद्धी प्रमुख सचिन एस. अंभोरे, किशोर महाजन,सुभाष पाटोळे, एल.व्ही. बिडवे. नजिम काजी, गणेश वासलवार, संतोष देशमुख, तुषार बोडखे, पुरुषोत्तम पाटील, सावेश जाधव, राजू खंडाळकर, भास्कर निकाळजे, सिद्धेश्वर थोर, भानुदास मते, आदींची यावेळी उपस्थिती होती.