जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ चौकात आज भव्य दीपोत्सव ; राष्ट्रमाता जिजाऊ, शिवशंभू भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १०
छत्रपती संभाजी नगर | राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त औरंगाबाद जिल्हा जिजाऊ जयंती महोत्सव समितीच्या वतीने केंब्रीज शाळेजवळील जिजाऊ चौकात भव्य दीपोत्सव राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीच्या पूर्व संध्येला बुधवारी (दि.११) आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा जिजाऊ जयंती महोत्सवाचे अध्यक्ष अप्पासाहेब विनायकराव हिवाळे पाटील यांनी दिली. या दीपोत्सवात राष्ट्रमाता जिजाऊ, शिवशंभू भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
बुधवारी सायंकाळी ६ वाजता भव्य दीपोत्सव, ७ ते ८ वाजेदरम्यान पोवाड्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. ८ ते ९.३० वाजेदरम्यान समाजातील कार्यरत असलेल्या विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा सत्कार सोहळा व मार्गदर्शन आयोजित करण्यात आला आहे. ९.३० ते ११.३० दरम्यान इस्कॉन च्या वतीने कीर्तन व राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाचा पाळणा हा कार्यक्रम होईल. तर १२ जानेवारी, गुरुवार रोजी सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान ढोल ताशांनी स्वागत व त्यानंतर राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात येईल. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष विकीराजे पाटील, संस्थापक कार्याध्यक्ष राजीव थिटे पाटील, समिती सचिव बाळासाहेब भगनुरे, प्रसिद्धी प्रमुख सचिन एस.अंभोरे, जिजाऊ महोत्सवाची सर्व महिला-पुरुष-युवक-युवती कार्यकारणी आदी पुढाकार घेत असल्याची माहिती जिल्हा जिजाऊ जयंती महोत्सवाचे अध्यक्ष अप्पासाहेब विनायकराव हिवाळे पाटील यांनी दिली.