गायब झालेल्या ३२ हजार मुलींचे काय झाले ; “द केरला स्टोरी”चे ७ मे रोजी राहुल बोरोले यांच्या वतीने मोफत शो

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ४
छत्रपती संभाजी नगर | केरळ राज्यातून अचानक पणे गायब झालेल्या ३२ हजार मुलींचे काय झाले याचे रहस्य उलगडणारा आणि प्रेक्षकांची प्रचंड उत्सुकता शिगेला पोहोचवणाऱ्या विपुल अमृतलाल शाह निर्मित, सुदीप्तो सेन दिग्दर्शित आणि अदाह शर्मा अभिनित “द केरला स्टोरी” या चित्रपटाच्या मोफत शो चे आयोजन हिंदू धर्म जनजागृती मोहिमे अंतर्गत नमो फौंडेशनचे सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष राहुल बोरोले यांच्या वतीने रविवार (दि.७) रोजी सिडकोतील फेम तापडिया चित्रपट गृहात सकाळी ११ वाजता करण्यात आले असून हिंदू तरुणी, माता, भगिनींनी या चित्रपटाच्या मोफत तिकिटासाठी मो. 8698888007 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पहा उत्कंठा वाढविणारा “द केरला स्टोरी” चित्रपटाचा टीझर….
https://www.youtube.com/watch?v=14fPOYDFMZE