अश्लील भाषेत महिलांचा अपमान करणाऱ्या संजय शिरसाठ यांच्या विरोधात शिवसेना (उ.बा.ठा) महिला आघाडीचे आंदोलन ; काळे झेंडे दाखवून महिलांनी केला निषेध व्यक्त

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २८
छत्रपती संभाजीनगर | शिंदे गटाच्या शिवसेनेचा मेळावा नुकताच शहरांमध्ये पार पडला या मेळाव्यात आमदार संजय शिरसाठ यांनी शिवसेनेच्या (उ.बा.ठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी अश्लील अपशब्द वापरल्यामुळे शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत असून मंगळवारी (दि.२८) महिला आघाडीच्या वतीने क्रांतीचौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय शिरसाट यांच्या तोंडाला शेण लावून, तसेच त्यांच्या फोटोला जोडे मारून महिलांनी आपला संताप व्यक्त केला.
“महिलांचा अवमान करणाऱ्या शिंदे सरकार हाय हाय”, “संजय शिरसाट हाय हाय” , “संजय शिरसाटच करायचं काय खाली मुंडक वर पाय”, “पन्नास खोके खाऊन खाऊन माजलेत बोके” या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महिलांनी हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप यांनी शिंदे सरकार मधील मंत्री लोकप्रतिनिधी कायम महिलांच्या बाबतीत अपशब्द वापरत असतात या आधी सुद्धा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी मंत्री अब्दुल सत्तार यांनी, सुषमा अंधारे यांच्या विषयी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आता परत सुषमा अंधारे यांच्या विषयी संजय शिरसाठ यांनी अश्लील भाषेमध्ये गरळ ओकली आहे, यावरून शिंदे सरकारमधील लोकप्रतिनिधींचे संस्कृतीचे दर्शन महाराष्ट्राला घडत असून अशा प्रकारे शिंदे सरकार मधील लोकप्रतिनिधी महिलांचा अपमान करत असतील तर आम्ही महिला हे कदापी सहन करणार नाही, याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू, आम्ही बाळासाहेबांच्या तालमीत घडलेल्या शिवसेनेच्या रणरागिणी आहोत, वेळ पडली तर यांच्या तोंडाला काळे फासायलाही आम्ही मागे पुढे पाहणार नाही असा इशारा प्रतिभा जगताप यांनी दिला.
या आंदोलन प्रसंगी उपजिल्हा संघटिका अनिता मंत्री, दुर्गा भाटी, शहर संघटिका विद्या अग्निहोत्री, अशा दातार, सुनिता सोनवणे, विधानसभा संघटिका मीरा देशपांडे, मीरा पाटील, सुचिता आंबेकर, सुकन्या भोसले, सारिका शर्मा, लता त्रिवेदी, मीना थोरवे, विद्या खाडीलकर, मीरा चव्हाण, स्मिता रामचंद्र, छाया जाधव, मीनल राणे, सविता आंभोरे, विमल आव्हाड, शोभा बडे, कांता गाडे, इंदिरा कदम, आशा भामरे, मीरा कदम, प्रेम लता चंदन, प्रतिभा राजपूत, उषा कोरडे, सुनिता गरुड, आरती साळुंखे, मनीषा खरे ,रेखा शाह ,नीता शेळके, संध्या रावलेलू, रोहिणी काळे, संगीता पवार, वैशाली आरट ,कमल भरड, भारतीय हिवराळे, मंदा भोकरे, रेणुका जोशी, कविता मठपती, प्रेम लता चंदन आदी महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.