मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर विधीवत स्तंभपूजन ; महाविकास आघाडीची येत्या २ एप्रिल रोजी अतिविराट सभा

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २७

छत्रपती संभाजीनगर |  महाविकास आघाडीची येत्या २ एप्रिल रोजी अतिविराट सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेची जोरदार तयारी संपूर्ण जिल्हाभर सुरू आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या या सभेच्या ठिकाणी आज विधिवत स्तंभपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्ष नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या हस्ते विधिवत स्तंभपूजन करण्यात आले.

याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, माजी आमदार किशोर पाटील, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, संतोष जेजुरकर, विनायक पांडे, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, तालुकाप्रमुख बाळू गायकवाड, संजय मोटे, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, लोकविकास बँकेचे अध्यक्ष जे के जाधव, जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप, लातूरचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथराव गवळी, युवराज राठोड ,अशोक थोरात, मारुती साळवे, सिनेट सदस्य दत्ता भांगे,उपशहरप्रमुख सुगंधकुमार गडवे, राजेंद्र दानवे ,जयसिंग होलीये, राजू खरे,अभिजीत पगारे, प्रीतेश जयस्वाल, नंदू लबडे, प्रवीण शिंदे, कृष्णा भोसले, सनी गिल, संदीप हिरे, गणेश मुळे, प्रदीप जाधव, अभिषेक नागोबा, बाळूभाऊ खेत्रे, सुनील पाखरे, मनीष बोरसे, सुनील घोडके, समीर कुरेशी, सुधीर घाडगे, शहर संघटिका सुनीता सोनवणे, अशा दातार, विधानसभा संघटिका मीरा देशपांडे, राखी सुरडकर, रेणुका जोशी, सुनंदा खरात, कांता गाडे, अलका कांदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

मैदान अपुरे पडेल – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर महाविकास आघाडीची अति विराट सभा या ठिकाणी होणार असून यावेळेस मैदानही अपुरे पडेल एवढ्या प्रचंड प्रमाणात लोक या ठिकाणी येतील मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात हा विकास आघाडीला जबरदस्त चांगल वातावरण आहे या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडी यशस्वीपणे वाटचाल करेल.

 

परिवर्तनाची नांदी या सभेच्या माध्यमातून संभाजीनगरातूनच होणार – विरोधी पक्षनेता अंबादास दानवे

महाविकास आघाडीची पहिली सभा ही संभाजीनगरात होत असून “न भूतो न भविष्यती” अशी रेकॉर्ड ब्रेक ही सभा होणार आहे. या सभेची जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे, परिवर्तनाची सुरुवात या सभेच्या माध्यमातून संभाजीनगरातूनच होणार.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!