परभणी ते चैत्यभूमी धम्मपदयात्रे छत्रपती संभाजीनगर मध्ये भव्य स्वागत ; अस्थी कलशाचे दर्शन घेण्यासाठी उसळला जनसागर

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२७
छत्रपती संभाजीनगर | जगाला प्रज्ञा, करुणा, मैत्री आणि शांतीचा संदेश देणाऱ्या महाकारुणिक तथागतांचा अस्थीकलश घेऊन ‘परभणी ते चैत्यभूमी’ अशी विशाल धम्मपदयात्रा छत्रपती संभाजीनगर मध्ये पोहोचली. ही धम्मपदयात्रा केंब्रिज ते बाबा पेट्रोल पंप दरम्यान पोहोचली तेव्हा या पदयात्रेचे विविध चौकांमध्ये नागरिकांनी दर्शन घेऊन भव्य स्वागत केले. थायलंड च्या भिक्खू संघाला वंदन करून आयोजक सिद्धार्थ हत्तीहंबीरे आणि सिनेअभिनेते गगन मलिक यांना नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.
सकाळी केब्रीज चौकापासून या पदयात्रेला प्रारंभ झाला होता. चिकलठाणा, म्हाडा कॉलनी, श्रीरामनगर, संजयनगर, मुकुंदवाडी, एपीआय कॉर्नर, सिडको वसंतराव नाईक चौक, सेव्हन हिल, अमरप्रीत चौक, रमानगर, क्रांतीचौक, क्रांती नगर, बाबा पेट्रोल पंप, छावणी, वाळूज-पंढरपूर याठिकाणी पदयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी अनुयायांनी अस्थी यात्रेचे दर्शन घेत सर्व बौद्ध भिक्खू यांच्या मार्गात फुलांची उधळण करून पदयात्रेचे भव्य स्वागत केले. या पद यात्रेचा शुक्रवारी तिसगाव येथे मुक्काम असून शनिवारी चैत्यभूमी कडे हि पदयात्रा मार्गस्थ होणार आहे. अस्थी कलशाचे दर्शन घेण्यासाठी महिला, तरुणी पुरुष तसेच युवकांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली.
