महिलादिनानिमित्त हळदी कुंकुवाने विधवा महिलांचा सन्मान ; एमआय लाईफ स्टाईलचा उपक्रम ; अनु चव्हाण यांनी केले रोजगार मार्गदर्शन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१५ 

छत्रपती संभाजीनगर | आयुष्याचा जोडीदार या जगात नसला तरी त्या विधवा महिलांना समाजात मान-सन्मान मिळाला पाहिजे, सुवासिनी सारखे जगता आले पाहिजे, तसेच रूढी परंपरे नुसार आयोजित कार्यक्रमात सहभागी होता आले पाहिजे या उदात्त हेतूने शहरातील ए-वन ग्रुप च्या वतीने विधवा महिलांना महिला दिना निमित्ताने हळदी कुंकू देत त्यांचा सन्मान करण्याचा अनोखा सन्मान सोहळा शनिवारी (दि. ९) एमआय लाईफ स्टाईल ग्लोबल प्रा.लि. च्या वतीने ए वन ग्रुप च्या प्रमुख अनु चव्हाण यांच्या पुढाकाराने भानुदास चव्हाण सभागृहात करण्यात आला होता. याप्रसंगी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

एम.आय.लाइफस्टाइल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ए वन ग्रुप संभाजीनगर च्या अनु चव्हाण सातत्याने महिलांसाठी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवतात. आजच्या स्पर्धेच्या युगात पुरुषांच्या बरोबरीने महिला अनेक ठिकाणी विविध क्षेत्रात काम करतात. त्यांच्या कर्तुत्वाचा सन्मान होणे गरजेचे असल्याची भावना ठेवून महिला दिनी विधवा महिलांचा सन्मान व्हावा या प्रामाणिक उद्देशाने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे अनु चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत स्पर्धामध्ये सहभागी महिलांचा विशेष पारितोषिके देऊन त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विधवांना मानसन्मान व हळदीकुंकू लावून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी महिलांना रोजगार मार्गदर्शन शिबिरचे आयोजनही  करण्यात आले होते.  हेड कॉन्स्टेबल सविता राठोड यांनी विविध गीत गाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए वन ग्रुप च्या प्रमुख अनु चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चित्रा थोरात, रंजना सोळस, मनीषा काळे, छाया येळवंते, जयश्री दसपुते, आशा ढगे, हिराबाई गोल्हार, शोभा सदावर्ते, सुनिता देवरे, संगीता डोंगरदिवे, सुष्मिता साबळे, मीना तांगडे यांनी पुढाकार घेतला. यावेळी विविध मनोरंजनात्मक गेम शो आयोजित करून महिलांचा उत्साह वाढविण्यात आला.

 

विधवा महिलांना मान-सन्मान मिळावा हि प्रामाणिक भावना…

ज्यांच्या पतीचे निधन झाले आहे अशा महिलांना अनेक कार्यक्रमात सहभागी करून घेतल्या जात नाही. त्यांनाही सुवासिनी महिलांसारखे जगता यावे, त्यांनाही समाजातील मान-सन्मान मिळावा हि प्रामाणिक भावना ठेवून ए वन ग्रुप च्या वतीने महिला दिनानिमित्त विधवा महिलांचा सन्मान केला. महिलांना स्वावलंबी होता यावे यासाठी रोजगार मेळाव्याचेही आयोजन मोठ्या स्वरुपात करणार.

-अनु चव्हाण, कार्यक्रम संयोजक, ए.वन ग्रुप, छत्रपती संभाजी नगर.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!