६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा छत्रपती संभाजीनगर केंद्रातून ‘नास्ती तृष्णा समो व्याधी प्रथम

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१३
छत्रपती संभाजी नगर | मुंबई : ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर केंद्रातून संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद या संस्थेच्या नास्ती तृष्णा समो व्याधीः या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. विभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली. या नाटकाची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे छत्रपती संभाजीनगर-बीड केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
रुक्मिणी बहुउद्देशीय संस्था, जालना या संस्थेच्या ट्रॅफिक जॅम या नाटकास द्वितीय पारितोषिक नाट्यांकुर, जालना या संस्थेच्या बिग बॉस या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक डॉ. सुरेखा मसाळ (नाटक- नास्ती तृष्णा समो व्याधी:), द्वितीय पारितोषिक शितल भातंब्रेकर (नाटक- ट्रॅफिक जॅम), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक वाल्मीक जाधव (नाटक- नास्ती तृष्णा समो व्याधी:), द्वितीय पारितोषिक मंगेश भिसे (नाटक- गुलाल), नेपथ्य: प्रथम पारितोषिक मनोज ठाकूर (नाटक-नास्ती तृष्णा समो व्याधीः) द्वितीय पारितोषिक शितल भातंब्रेकर (नाटक- ट्रॅफिक जॅम) रंगभूषा प्रथम पारितोषिक आशा दिक्षित (नाटक- नास्ती तृष्णा समो व्याधी:), द्वितीय पारितोषिक अशोक जाधव (नाटक धर्मदंड) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक शरद कुलकर्णी (नाटक-ट्रॅफिक जॅम) व श्रुती कुलकर्णी (नाटक- नास्ती तृष्णा समो व्याधीः), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे रेखा चव्हाण (नाटक- बिग बॉस), आदिती खडकीकर (नाटक- नास्ती तृष्णा समो व्याधी:), यशश्री मुळे (नाटक-ट्रॅफिक जॅम), प्रियंका गजभिये (नाटक- जंटलमन), आश्विनी गायकवाड (नाटक- पाऊस), नचिकेत डांगोरे (नाटक- नास्ती तृष्णा समो व्याधी:), सुमित शर्मा (नाटक-बिग बॉस), संतोष पठाडे (नाटक-गुलाल), योगेश म्हेत्रजकर (नाटक- गुलाल) शंकर दुबे (नाटक-थोडे थोडे पण तिन्ही वेडे) दि. २० नोव्हेंबर २०२३ ते ०४ डिसेंबर २०२३ या कालावधीत तापडिया नाट्य मंदिर, छत्रपती संभाजी नगर व यशवंत नाट्य मंदिर, बीड येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण ११ नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. भालचंद्र कुबल, डॉ. गणेश वडोदकर आणि श्रीमती संगीता परदेशी यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम आलेल्या नाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.