श्री गणेश महासंघाच्या कार्यालयात “श्री” ची प्रतिष्ठापना ; पालकमंत्री संदीपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाठ, यांची उपस्थिती

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १९
छत्रपती संभाजी नगर | : यंदाचा “श्री” गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती सज्ज झाली आहे. महासंघाच्या “श्री” ची प्रतिष्ठापना मंगळवारी (दि.१९) निराला बाजार, येथील मोतीवाला कॉम्प्लेक्स च्या केएफसी बिल्डींग मध्ये असलेल्या श्री गणेश महासंघाच्या संपर्क कार्यालयात बंडोपंत गुरूजी यांच्या पौरोहित्याखाली गणरायाच्या मुर्तीचे पुजन व आरती करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाठ, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार, उत्सव समिती अध्यक्ष राजेंद्र जंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख, अभिषेक देशमुख, अनिल मकरिये, किशोर तुलसीबागवाले , रामु शेळके, राजु पारगावकर, सदिंप शेळके, अनिकेत पवार ,विशाल दाभाडे, हरीश शिंदे, दत्ता भांगे,अमोल पाटे, निलेश उबाळे, जयराम कुटे, संजय वरकड पाटील, या मान्यवरांच्या उपस्थितीत श्री गणेशाची आरती करण्यात आली.
महासंघाच्या वतीने आज सामूहिक श्री गणेश अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती च्या वतीने श्री गणेशोत्सव निमित्ताने शिवाजी नगर येथील जिजामाता गणेश मंडळ येथे बुधवारी (दि.२०) सकाळी ८ वाजता सामूहिक श्री गणेश अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुले तसेच विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक संस्कार रुजावे तसेच हिंदू संस्कृतीतील सण, उत्सव, परंपरा याबाबत जनजागृती व्हावी यासाठी या अभिनव उपक्रमाचे व्यापक स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. या सामूहिक अथर्वशीर्ष पठण उपक्रमात प्रत्येक, विद्यार्थी, पालक, श्री गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समिती अध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी केले आहे.