सत्तेच्या राजकारणात सत्ताधाऱ्याना शेतकऱ्यांचा विसर ; बीआरएस चे अण्णासाहेब माने यांचा आरोप

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.३

एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसून दुसरीकडे राजकीय पक्ष सत्तेसाठी फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचे सत्ताधारी राजकारण्यांच्या राजकीय भूमिकेवरून दिसत आहे. या राजकीय भूकंपाला जनता आता कंटाळली असून सत्तेच्या राजकारणात सत्ताधाऱ्याना शेतकऱ्यांचा विसर पडल्याचा आरोप भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक तथा माजी आमदार आण्णासाहेब माने यांनी सोमवारी (दि.३) आयोजित पत्रकार परिषदेत केला.

माने पुढे म्हणाले कि, राज्यातील एकाही नेत्यांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळे तेलंगाना राज्यामध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचा विकास झालेला आहे. त्याच्याही दुप्पट विकास आगामी काळात भारत राष्ट्र समिती करेल असा ठाम दावा मनी यांनी यावेळी केला. राज्यात खरीप हंगामाला सुरवात झाली असली तरीही अद्याप पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.  यासाठी राज्य सरकारने दुबार शेतकऱ्यांना पेरणीसाठी अनुदान द्यावे अशी मागणी माने यांनी पत्रकार परिषदेत केली. गेल्या चार वर्षात राज्यात शेतकरी, कष्टकरी जनता महागाईमुळे त्रस्त झाली आहे. मात्र येथील राजकारण्यांना जनतेचा विसर पडला आहे. असेही माने म्हणाले. तर राजकिय उलथापालथीवर बीआरएसचे समन्वयक कदीर मौलाना म्हणाले की, राज्यात जातीवादी आणि धर्मनिरपेक्षक म्हणून घेणाऱ्या पक्षाने जनतेची दिशाभूल केली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचा उपयोग केला. धर्मनिरपेक्षेच्या नावावर काही राजकीय पक्षांनी मते घेतली परंतु तेच आज सत्तेत सहभागी झाले आहे. सध्याची राजकीय उलथापालथ ही शरद पवारांच्या घरामधून ठरवून होत आहे. गेल्या २५ वर्षा पासून मी या पवार घराण्याला पाहत आलो आहे. या घरात जयंत पाटील हे शकुनी मामा आहेत. तर शरद पवार व अजित पवार हे सगळे एका माळीचे मणी असल्याचा आरोपही मौलानांनी केला. भारत राष्ट्र समितीचे अशोक भातपुडे, महिला आघाडी समन्वयक सुनिता सोनटक्के, योगिता पठाडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!