शोभायात्रेने होणार ‘युवा महोत्सव’चा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सज्ज ; चार दिवसांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२४  

छत्रपती संभाजीनगर | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित ‘युवा महोत्सव’चा प्रारंभ पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात शोभायात्रेने होणार आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.

मुख्य परिसरात २५ ते २८ डिसेंबर दरम्यान युवा महोत्सव होणार आहे. संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कार्यक्षेत्रातील चार जिल्हयातून २९५ महाविद्यालयाने सुमारे दोन हजार विद्यार्थी कला सादर करणार आहेत. मुख्य सोहळा नाटयशास्त्र विभागाशेजारील सृजनरंग या मंचावर होणार आहे. तर लोकरंग (नाट्यगृह परिसर), नाट्यरंग (नाटयगृह), नाद रंग (कबड्डी मैदान), शब्दरंग (क्रीडा विभाग) व ललित रंग (ललित कला विभाग) या सहा ठिकाणी कला सादर होणार आहेत. पहिल्या दिवशी बुधवारी सकाळी ८:३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यापीठातील पूर्णाकृती पुतळ्यापासून शोभायात्रा निघणार आहे. देशासमोरील ज्वलंत विषयावर संघ आपले देखावे सादर करणार आहेत. यानंतर ही शोभायात्रा सृजनरंग या मुख्य रंगमाच जवळ पोहचेल.

महोत्सवाचे उद्घाटन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होईल. यावेळी अभिनेते तथा निर्माते मंगेश देसाई, अभिनेते धनंजय सरदेशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. कुलगुरु डॉ. विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी प्र. कुलगुरु डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभुरे व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगिता होके पाटील, अॅड. दत्तात्रय भांगे यांची उपस्थिती राहणार आहे. तर समारोपप्रसंगी प्रख्यात अभिनेते समीर चौघुले, माजी विद्यार्थी तथा अभिनेते श्याम राजपूत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येईल. क्रमांक पाच शब्दरंग शिक्षण विभाग इमारत वाङ्-मय विभाग काव्यवाचन, वादविवाद, वक्तृत्व, प्रश्नमंजूषा. रंगमंच क्रमांक सहा-ललितरंग : ललितकला विभाग चित्रकला, कोलाज, पोस्टर, मृदमूर्तीकला, व्यंगचित्रकला, रांगोळी, स्पॉट फोटोग्राफी, लघुपट. याप्रमाणे सहा रंगमंचावर महोत्सव रंगणार आहे. त्यामुळे कला सादरीकरण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना सोपे होणार आहे. त्यातच दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमांची आणखीच रंगत वाढणार असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात चैतन्य पसरल्याचे दिसत आहे.

असे होणार सहा रंगमंचावर कार्यक्रम….

यंदाच्या युवक महोत्सवात सहा कला गटात ३६ कलाप्रकार सादर होणार आहेत. भाग व कलाप्रकार पुढील प्रमाणे रंगमंच क्रमांक एक सृजनरंग उदघाटन व समारोप सोहळा, नाट्यशास्त्र विभाग नृत्य विभाग लोक / आदिवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य, जलसा, लावणी, कव्वाली, पोवाडा, भारतीय शास्त्रीय सुरवाद्य, रंगमंच क्रमांक दोन-लोकरंग नाट्यगृह परिसर, महाराष्ट्राच्या लोककला पोवाडा, भारुड, वासुदेव, गोंधळ, भजन, लोकगीत, लोकनाट्य रंगमंच क्रमांक तीन नाटयरंग विद्यापीठ नाट्यगृह एकांकिका, पाश्चात्य समूह गायन, प्रहसन, मिमिक्री, भारतीय शास्त्रीय नृत्य, मूकअभिनय, जलसा रंगमंच क्रमांक चार- नादरंग (कबड्डी मैदान): संगीत विभाग शास्त्रीय गायन, शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय सुरवाद्य, सुगम गायन (भा), सुगम गायन (पा.), समूह गायन (भा), समूह गायन (पा), लोक वाद्यवृंद, कव्वाली, जलसा.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!