भाजपा महिला मोर्चा च्या वतीने टीव्ही सेंटर चौकात खा. धिरज प्रसाद साहु निषेधार्थ पुतळा दहन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.११
छत्रपती संभाजी नगर | येथील हडको मंडळ येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कडून कॉंग्रेस पक्षाचा खासदार धीरज साहू याच्या घरातील धाडीमध्ये जवळपास ३०० कोटींची संपत्ती आढळून आली. खासदार धिरज प्रसाद साहु याच्या निषेधार्थ पुतळा दहन करण्यात आला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस संजयजी केणेकर, प्रदेश सचिव किरण पाटील, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस मीनाताई मिसाळ, डॉ.उज्वलाताई दहिफळे, शहर जिल्हा सरचिटणीस शिवाजी दांडगे, शहर जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत थेटे,मंडळाध्यक्ष सागर पाले, छायाताई खाजेकर, पुजाताई सोनवणे, सोशल मीडिया प्रमुख पंकज वैष्णव, राजू पळसकरशालिनी बुंधे, जालिंदर शेंडगे, मनोज भारस्कर,विवेक राठोड, लता सरदार, रामलाल बकले, योगेश दणके, प्राप्ती चव्हाण, आदी उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत भाजप पदाधिकाऱ्यानी खासदार धीरज प्रसाद साहू यांचा निषेध व्यक्त केला.