भाजप विधिमंडळाच्या गटनेते पदी देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस ; “मी ईश्वर साक्ष शपथ घेतो कि…. देवाभाऊ पुन्हा

सचिन लिला सुखदेव अंभोरे | लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क
मुंबई | दि.४ : “एक है तो सेफ है” असे म्हणत भारतीय जनता पक्ष, विधिमंडळा च्या गटनेते पदी देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस यांची सर्वानुमते निवड केल्याने महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला असून गुरवारी (दि.५) मुंबईतील आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्यात “मी ईश्वर साक्ष शपथ घेतो कि…. अशी गगनभेदी ललकारी संपूर्ण महाराष्ट्राच्या साक्षीने घुमणार आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे या महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करतील. पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे आणि मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार… अशी घोषणा देणारे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महराष्ट्राच्या राजकारणात शपथ घेणार आहेत.
१३२ जागा जिंकत बहुमताच्या जवळ गेलेल्या भाजप ने कासव गतीने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजप ची हि किमया आता लक्षवेधी ठरली असून राष्ट्रवादी तसेच शिवसेना यांनीही पुन्हा देवा भाऊ यांनाच सत्ता स्थापनेसाठी पाठींबा दिला आहे. गटनेते पदी निवड होताच देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, अपेक्षा पूर्णतेची,संघर्षाची यापुढील वाट आहे. अनेकांना मंत्रीपदाची इच्छा आहे. ती पूर्ण करण्यासाठी सर्व मित्रांना सोबत घेऊन हे महायुतीचे सरकार काम करणार आहे. सर्वांचेच स्वप्न पूर्ण करणे शक्य नसले तरी त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल. २०१९ साली जन्तेचाज कौल आपल्याला मिळाला होता. मात्र दुर्दैवाने जनतेसोबत एक प्रकारे बैमानी त्या वेळी झाली होती असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला. सुरवातीच्या काळात खूप त्रास देण्यात आला. मात्र या अडीच वर्ष एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. त्यांनी आपल्या भाषणात अनेकांना संकेत आणि इशारे यावेळी दिले आहे. सत्ता नाट्याच्या १२ दिवसानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुरब्बी राजकारणी असून मागील कोणत्याही गोष्टी आपण काढायच्या नाही. आपण एक नवी सुरुवात करणार आहोत असे त्यांनी आपले मनोगतात व्यक्त केले.