निजामाच्या अवलादीचा मंत्री सिल्लोड मध्ये ; घोटाळे बाहेर काढून घरी बसवणार ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा हल्लाबोल

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २०
छत्रपती संभाजीनगर | दि.२० : सिल्लोड मतदार संघातील मंत्री सर्व काही स्वतःच्या नावावर करून टॅक्स मात्र पाचपट लावतो. निजामाच्या काळातील जिजिया कर लावणारा निजामाच्या अवलादीचा मंत्री सिल्लोड मध्ये असून येथील जनता त्यांना घरी पाठवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. कित्येक घोटाळे या मंत्र्यांनी केलेले असून याचे पुरावे आमच्याकडे आहेत. ते लवकरच सर्वांसमोर येतील, असा हल्लाबोल अप्रत्यक्षपणे महाप्रबोधन यात्रेस संबोधित करताना विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केला.
सिल्लोड मधील सगळ्या संस्था याच मंत्र्याच्या नावावर, मार्केट कमिटी वडिलांच्या नावावर, तुमचे घर सुद्धा त्याच्या नावावर आहेत. कित्येकांचे घर या मंत्र्याने नावावर करून घेतले असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे. सिल्लोडच्या नागरिकांना सध्या बांधकाम परवानगी सुद्धा देत नाहीत, एखादा मजला जरी वाढवायचा असला तरी तो वाढू देत नाही. टॅक्स मात्र पाचपट लावतो. येथील सीईओ त्याच्याच घरची चाकरी करतो. एवढा जाच या मतदार संघातील जनतेवर होत असून लवकरच तुमची या जाचातून आम्ही सुटका करू,अशी ग्वाही त्यांनी सिल्लोडच्या जनतेला दिली.
राज्याचा कृषिमंत्री असताना मतदार संघातील जनतेची अतिवृष्टीची मदत अथवा पीक विम्याचा मोबदला मिळाला का याची चौकशी न करत तर कलेक्टरांना विचारतात तुम्ही दारू पिता का ? येणाऱ्या काळात एकदाचा याचा बिस्मिल्ला केल्याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना स्वस्थ बसणार नाही असा घणाघणात दानवे यांनी केला. भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याची काहीही चूक नसताना गुन्हा दाखल करून त्याला दोन महिने तुरुंगात पाठवल. त्या वेळी एकही भाजपच्या नेत्याने कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायाबद्दल जाब विचारला नाही, कारण त्यांची साठ गाठ आत्ताची नाही आधीपासुनची आहे. या मतदारसंघातले भाजपचे कार्यकर्ते तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. तुम्हाला वाटत असेल या मतदारसंघात शिवसेनेची ताकद नाही घाबरु नका डगमगू नका येणाऱ्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरेंची लाट या महराष्ट्रात येणार असून नक्कीच तेव्हा कोणी निजाम नसेल तर शिवसेनेचाच शिलेदार असेल असे दानवे म्हणाले. खोक्यांच्या जीवावर निवडणुका लढवल्या जातात, लाखो रुपये खर्च करून सभा घेतल्या जातात पण लक्षात ठेवा पैशांच्या जीवावर हे काही फार काळ टिकत नसत. त्यामुळे येणाऱ्या काळात निजामाच्या विरोधात आपल्याला लढाई लढायची असून सर्वसामान्य शिवसैनिकाच्या पाठीशी तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहून ही लढाई जिंकायची आहे. त्यामुळे निजामाच्या विरोधातल्या लढाईला सज्ज व्हा असे ते यावेळी बोलतांना म्हणाले.