स्वाभिमान एन ३ रास दांडियात तरुणाईचा बेधुंद जल्लोष ; दांडिया प्रेमींचा लक्षणीय प्रतिसाद, पारंपारिक वेषभुषेतून एकात्मतेचा संदेश

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१५    

छत्रपती संभाजीनगर |भारतीय संस्कृतीतील अस्सल दांडिया खेळत पारंपारिक वेशभूषेतून स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित एन ३, रास दांडियात तरुणाईचा बेधुंद जल्लोष दिसून आला. मराठी, हिंदी, गुजराती गाण्यांवर ताल धरत लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनीच ठेका धरला. उत्तोरोत्तर रंगत जाणऱ्या या रास दांडियाने पाहणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधले. एन ३ येथील शिवछत्रपती महाविद्यालयासमोरील गरबा मैदानावर आयोजित रास गरब्यात दांडिया प्रेमींचा लक्षणीय प्रतिसाद दिवसेंदिवस मिळत असून दांडियाप्रेमींची दांडिया खेळण्याची क्रेझ (दि.२१)सातव्या माळीला हि विलोभनिय ठरली. विजेत्या दांडिया पटूचे स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आयोजक प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, सचिव विशाल दाभाडे यांनी स्वागत केले.

नॉन स्टॉप गाण्यांचे बहारदार सादरीकरण आणि सोबतीला विविध रंगांच्या आकर्षक रोषणाईमुळे स्वाभिमान क्रीडा  मंडळाच्या वतीने आयोजित एन ३, रास दांडियात  भारतीय संस्कृतीतील विविध वेषभूषत सहभागी झालेल्या दांडियापटूंनी यावेळी पाहणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधले. दांडियापटूंचा बेधुंद जल्लोष आणि धमाल यानिमित्त्ताने शहरवासीयांना अनुभवायला मिळाला. उत्त्तरोत्त्तर रंगत जाणारे गीत संगीत आणि त्याच्या तालावर बेधुंदपणे दांडिया खेळण्याचा उत्साह आणि खास मराठमोळी संस्कृती जोपासत व दांडियापटूंचा मराठमोळा पेहराव यामुळे शिवछत्रपती महाविद्यालयासमोरील गरबा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या रास दांडियातील दांडिया खेळण्याचा रंग सहाव्या दिवशीही रंगत गेला.

दांडियाप्रेमींचा दांडिया खेळण्याचा उत्साह दिवसेंदिवस वाढत असून सातव्या  दिवशीही दांडिया खेळणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. विविध वेशभुषा तसेच लक्षवेधक दांडिया खेळुन प्रत्येकाला महाराष्ट्रातील प्रख्यात गायिका डॉ.प्रिया नरवडे, संदीप चाबुकस्वार, कुणाल वराळे  आणि समुहाच्या गीत संगीताच्या तालावर थिरकायला लावत असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र, गुजरात, तसेच बंगाली परंपंरेतील विविध वेषभुषेमुळे दांडियाप्रेमीं उत्कृष्ट नृत्य, वेशभुषेकरीता बक्षीसास पात्र ठरत आहे. या रास दांडियात नियमित खेळणाNया दांडियापटूंंना विशेष बक्षीस दिल्या जात आहे. मै निकला गड्डी लेके, झिंग झिंग झिंगाट… दिलदार का… देखा एक ख्वाब तो सिलसिले हुए… सुनो ना संगे मरमर, झिंगाट, नटरंग उभा… तारा विना शाम… पंखीडा अशा हिंदी, गुजराती तसेच विविध दिलखेचक मराठमोळ्या गांण्याच्या तालावर दांडियाप्रेमी नॉन स्टॉप सुरमयी गीतांवर बेंधुद होऊन थिरकली. शेवटी एक मिनटाच्या गीतावर तरुणाई जय श्रीराम… छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशा घोषणा देत बेंधुद जल्लोष करतात. उत्स्पुर्तपणे मोठ्या संख्येने महिला, तरुण-तरुणी बाल-गोपांळासह सहभागी झाल्याने या दांडिया खेळण्याचा उत्तरोत्तर रंग चढत आहे. या रास दांडियाचे थेट प्रेक्षेपण प्रमोद राठोड यांच्या फेसबुक पेजवरून होत असून शहरवासीयांंना या रासदांडियाचे थेट प्रेक्षेपण घरबसल्याही पाहता येत आहे. नवरात्र उत्सवात पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने महिला व मुलींची विशेष सुरक्षाव्यवस्था करण्यात आली असून अद्यावत सीसीटीव्ही द्वारे चित्रीकरण करण्यात येत आहे. प्रवेशीकेद्वारेच दांडियापटूंंना या एन-३ रास दांडियात सहभागी होता येणार असून रास दांडिया खेळणाऱ्या तसेच याठिकाणी भेट देणाऱ्या प्रत्येकांसाठी खाद्य दालनांची व्यवस्था करण्यात आली  आहे. या पारंपारिक रास दांडियात सहभागी होऊन रास दांडिया खेळण्याचे आवाहन स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, शहराध्यक्ष विशाल दाभाडे यांच्यासह मुख्य व्यवस्थापक प्रदीप राठोड, उत्सव समितीचे अध्यक्ष समीर लोखंडे, कार्याध्यक्ष अमरसिंग ठाकूर, उपाध्यक्ष अभिजित खरात, नितेश टेकाळे, सचिव विक्रांत पंजाबी, जीवन रौंदळ, पंकज परदेशी, सिराज कुरेशी, रऊफ पठाण, प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे, सिद्धी डेकोरेटर्स चे मनोज मामाजी बोरा, संदीप साऊंड चे संदीप काळे, छायाचित्रकार नितीन शेजूळ, यांनी केले आहे.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!