एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना ; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा महत्वपूर्ण निकाल ; दोन्ही गटाचे आमदार पात्र

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१०
मुंबई | शिवसेना कोणाची? हे जाणून घेण्याची उत्सुकता आज संपूर्ण देशाला लागली होती. एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना हि खरी शिवसेना असल्याचा महत्वपूर्ण निकाल आज विधासभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी (दि.१०) दिला. याचबरोबर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निकालामुळे एकनाथ शिंदे यांच्या श त्यांच्या सोबत आलेल्या ४० आमदारांना दिलासा मिळाला असला तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र मोठा धक्का बसला आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकाला विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र ठिकठिकाणी विरोध व निषेध व्यक्त सुरु केला आहे.
गेल्या अनेक महिन्यापासुन शिवसेना कुणाची याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. यावर राहुल नार्वेकर यांनी महत्वपूर्ण निकाल देत खरी शिवसेना हि एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे स्पष्ट केले. मात्र मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट ठिकठिकाणी आक्रमक होताना दिसून येत आहे. शिवसेना भवन समोर राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ठाकरे गटाच्या शिवसेनेने सुरु केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना इतिहास जमा करण्याचा प्रयत्न भाजप व शिंदे गटाने केला आहे. एका मराठी माणसाने मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. या निर्णयाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत.
खा. संजय राऊत, शिवसेना नेते ठाकरे गट.