यंदा दोन फेब्रुवारीपासून रंगणार ‘पिफ’ ; मराठवाड्यातील ग्लोबल आडगाव मराठी चित्रपटाची महोत्सवात निवड

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २५
छत्रपती संभाजीनगर | पुणे : फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (पिफ) सुरुवात अली अब्बासी (इराण) दिग्दर्शित होली स्पायडर या चित्रपटाने होणार आहे. या चित्रपट महोत्सवात सिल्वर ओक चे मनोज कदम, अमृत मराठे यांची निर्मिती असलेल्या व अनिलकुमार साळवे यांचे दिग्दर्शन असलेल्या “ग्लोबल आडगाव” या मराठी चित्रपटाची निवड आली आहे.
मिशेल हाजानाविसियस दिग्दर्शित ‘फायनल कट’ हा चित्रपट समारोपाला दाखविण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यंदा विविध सत्रांमध्ये राहुल रवैल, अरुणा राजे, जॉनी लिव्हर आणि विद्या बालन सहभागी होणार आहेत.
दोन ते नऊ फेब्रुवारीदरम्यान ‘पिफ’चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवातील मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदा मदार, ग्लोबल आडगाव, गिरकी, टेरेटरी, डायरी ऑफ विनायक पंडित, धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे आणि पंचक या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. मुकुंदनगर येथील थिएटर अकादमीच्या सकल ललित कलाघर येथे दोन फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. काही तांत्रिक कारणामुळे या वर्षी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या ठिकाणी महोत्सवातील चित्रपट दाखविण्यात येणार नाहीत. त्याऐवजी लष्कर परिसरातील ‘आयनॉक्स’ या ठिकाणी आणखी एक पडदा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे तिथे दोन आणि सेनापती बापट रस्त्यावरील ‘पीव्हीआर’मध्ये सहा पडद्यांवर महोत्सवातील चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, असे पटेल यांनी सांगितले.
महोत्सवातील कार्यशाळा आणि वक्ते :
दी इन्व्हिजिबल आर्ट ऑफ फिल्म एडिटिंग : ए. श्रीकर प्रसाद लेसन्स आय हॅव लर्न्ट सो फार : चैतन्य ताम्हाणे, थिंकिंग इमेजेस : शाजी करून,,मास्टरक्लास, मेनस्ट्रीम सिनेमा टुडे : राहुल रवैल,,ह्युमर इन सिनेमा : जॉनी लिव्हर, मेकिंग फिल्म्स अँड वॉचिंग फिल्म्स : जेंडर इन हिंदी सिनेमा : अरुणा राजे, डॉ. लक्ष्मी लिंगम, चॅलेंजेस ऑफ फिमेल अॅक्टर्स इन दी एंटरटेन्मेंट वर्ल्ड : विद्या बालन स्थळ : पॅव्हेलियन मॉलमधील ‘पीव्हीआर आयकॉन’