पहिल्या दोन दिवसात २८ कलाप्रकार सादर ; आज लावणी, लोकगीतांचे सादरीकरण ; युवक महोत्सवात तरुणाईची धमाल

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.६
छत्रपती संभाजीनगर | डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवात पहिल्या दोन दिवसात सहा रंगमंचावर २८ कलाप्रकार सादर करण्यात आले. पहिल्या दिवशी तर रात्री दोन वाजेपर्यंत एकांकिका सादर झाल्या. दरम्यान कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी गुरुवारी विविध रंगमंचाना भेट देऊन युवा कलावंतांना प्रोत्साहन दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सव ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान होत आहे. अभिनेते योगेश शिरसाठ व अनुष्का सरकटे यांच्या उपस्थितीत सोहळयास सुरुवात झाली.
समूह गायन (पाश्चात्य), समूह गायन (पाश्चात्य), कव्वाली, लोकवाद्य वृंद, भजन, भारुड, मुक अभिनय, एकांकिका शात्रीय तालवाद्य, वत्तृâत्व चित्रकला, व्यंगचित्र कला, कोलाज, लघुपट या महोत्सवात पहिल्या दिवशी आदी कलाप्रकार सादर झाले. पहिल्या दिवशी बुधवारी विद्यापीठाच्या नाटयगृहात रात्री दोन वाजेपर्यत एकांकिका सादर झाल्या. तर दुस-या दिवशी समुह गायन भारतीय, वासुदेव, गोंधळ, पोवाडा, शास्त्रीय नृत्य, प्रहसन, एकांकिका, लघुपट आदी कला प्रकार सादर झाले. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी गुरुवारी नाटयगृहात भेट देऊन शास्त्रीय नृत्य तसेच नाटयशास्त्र विभागात वासुदेव, भारुड कलाप्रकारचा आस्वाद घेतला. यावेळी संचालक डॉ.मुस्तजिब खान, संभाजी भोसले आदींची उपस्थिती होती. अभिनेत्री केतकी माटेगांवकर यांनीही शास्त्रीय सुरवाद्य, शास्त्रीय गायन, काव्यवाचन, प्रश्न मंजुषा लेखी परीक्षा, स्पॉट फोटो ग्राफी, रांगोळी युवा महोत्सवात विविध रंगमंचाना भेट दिली. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या कक्षात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ.भगवान साखळे याची उपस्थिती होती. महोत्सवात तिस-या दिवशी शुक्रवारी (दि.सहा) जलसा, लावणी, लोकगीते, लोकनाटय, लोक आदीवासी नृत्य, मिमिक्री, वादविवाद, प्रश्नमंजुषा आठ कलाप्रकार सादर होणार आहेत. युवा महोत्सवाचे आकर्षण असणा-या ’लावणी’चा कार्यक्रम गुरुवारी दुपारी २ ते रात्री १० या दरम्यान लोक वाद्यवृंद होणार आहे. ७० संघानी यात सहभाग नोंदविला आहे.
युवा महोत्सवात आजचे कार्यक्रम
(शुक्रवार दि, ६ ऑक्टोबर २०२३)
रंगमंच क्रंमाक – १ : सृजन रंग (मुख्य रंगमंच) (नाटयाशास्त्र विभाग)
जलसा – सकाळी ९ ते दुपारी १२
लोकवाद्य वृंद – दुपारी १२ ते दुपारी २
लावणी – दुपारी २ ते रात्री १०
रंगमंच क्रंमाक – २ : लोकरंग (नाटयगृह पार्कीग)
लोकगीत – सकाळी ९ वाजता
लोकनाटय – दुपारी १२ वाजता
रंगमंच क्रमाक – ३ : नाटयरंग (नाटयगृह)
मिमिक्री – सकाळी ९ वाजता
लोक आदिवासी नृत्य – दुपारी २ वाजता
रंगमंच क्रमाक – ४ : नादरंग (कबड्डी मैदान)
सुगम गायन भारतीय – सकाळी ९ वाजता
रंगमंच क्रमांक – ५ : शब्दरंग (जीएमएनआयआरडी विभाग)
वादविवाद – सकाळी ९ वाजता
प्रश्नमंजुषा तोंडी – सकाळी ११ वाजता
रंगमंच क्रमाक – ६ : ललितरंग (ललित कला विभाग)