महिलेची छेडछाड करणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १६
छत्रपती संभाजीनगर | शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त असलेल्या विशाल ढुमे याच्यावर एका महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी सोमवारी (दि.१६) विशाल ढुमेला अटक करुन, न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
काय आहे घटना…
शहर गुन्हे शाखेचे कालपर्यत कार्यरत असलेले सहाय्यक आयुक्त विशाल ढूमे यांनी शुक्रवारी रात्री सिडको परिसरातील पाम हॉटेल मध्ये गेले होते. यावेळी त्यांनी भरपुर दारू पिल्याने ते तर्रर झाले होते. याच हॉटेल मध्ये त्यांचा एक मित्र हा पत्नीसोबत जेवण करण्यासाठी आला होता. त्यांच्या सोबत गप्पा सुरू असताना ढुमे यांनी मी गाडी घेऊन आलो, नसल्याचे मित्राला सांगितले. तसेच त्याला घरापर्यत सोडण्यास सांगितले. अधिकारी असल्याने मित्र देखील तयार झाला. मात्र मध्येच मला बाथरूमला जाणे असल्याचे म्हणाले त्यामुळे मित्र त्यांना घरी घेऊन गेला. तेथे घरातील बाथरूम मध्ये जाण्यास सांगितले. मात्र ढुमे हे अति दारू पिलेले असल्याने त्यांनी मित्राच्या बेडरूममधील बाथरूम मध्ये जातो म्हटले, त्याला देखील मित्राने परवानगी दिली. तेव्हा बाथरूम मध्ये जाण्याचे नाटक करीत ढुमेनी महिलेसोबत लगट करण्यास सुरूवात केली. महिलेनी आरडाओरड केल्याने कुटूंबिय धावून आले. त्यांनी ढुमे यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र ढुमेनी त्यांना दमदाटी करून मारहाण केली. अखेर कुटूंबियांनी ११२ नंबरवर फोन केल्यावर पोलिस येऊन ढुमेला घेऊन गेले. त्यानंतर महिलेनी सिटीचौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी घरात घुसून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी सोमवारी विशाल ढुमेला अटक करुन, न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.