दिवाळी शेतकऱ्यांची तर दिवाळे निघेल राजकीय सत्ताधाऱ्यांचे ; मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे सरकोलीत वक्तव्य

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २७
सरकोली | तेलंगणाचे जे हि काम आहे ते भूल भुलय्या आहे असे आरोप केले जात आहे. मी मराठी बोलू शकत नाही पण मी मराठी समजू शकतो असे सांगत मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले कि एवढा आक्रोश बीआरएस सारख्या लहान पक्षाच्या विरोधात का आहे. इतर पक्षाने आरोप लावले कि बीआरएस टीम आहे. पण हि शेतकऱ्यांची पार्टी आहे. शेतकरी बीआरएस सोबत जोडले जाऊ लागल्याने इतर पक्षातील सत्ताधाऱ्याना आता बीआरएस ची भीती वाटू लागली आहे. परिवर्तन जरूर होणार असून आणि परिवर्तीत भारत हेच आपल्या सर्व समस्यांचे समाधान आहे. त्यामुळे आगामी काळात दिवाळी शेतकऱ्यांची होणार असून राजकीय दिवाळे सत्ताधारी पुढाऱ्यांचे निघणार आहे. कारण “अब कि बार किसान” सरकार हा नारा बी आर एस चा आहे असे बोलत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यानिई विरोधकावर मंगळवारी (दि.२७) सरकोली येथील सभेत तोफ डागली.
पंढरपूर येथे विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले कि, तेलंगाना सारख्या योजना महाराष्ट्रात नाहीये. यावरून या सरकारची शेतकऱ्याना पाणी देण्याची इच्छा नाही हे दिसून येत आहे. यासाठी देशाला क्रांती मार्गावर चालावे लागेल. भारताचे परिवर्तन होणे गरजेचे आहे. सत्ता येते जाते, देशाचा विकास होणे गरजेचे आहे. आपण अंधारात भरकटून चाललो आहे. कोणतेही लक्ष दिसून येत नाही. आता आणखी एक स्वातंत्र्याची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. ७५ वर्ष होऊनही आपण अंधारात चाचपडत आहोत. एक वेळ होती जेव्हा आपल्यापेक्षाही चीन गरीब देश होता. आता मात्र त्यांची प्रगती पाहून आपल्यालाही विचार करावा लागणार आहे.
कॉंग्रेस ने ५० वर्ष राज्य केले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांना सर्वाना आपण संधी दिली. यावेळेस बी आर एस ला संधी द्या असे आवाहन यावेळी के चंद्रशेखर राव यांनी केले. बीआरएसला कुणाशीही जोडल्या जाऊन आरोप केल्या जात आहे. आम्ही कुणाशी हि जोडले गेलो नसून आम्ही शेतकरी, दलित, अल्पसंख्यांक यांच्याशी जोडले गेलो आहोत. त्यामुळे इतर पक्षातील पुढाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांना ३ ४ महिन्यात आलेल्या बीआरएस पक्षाची भीती वाटू लागल्याचे दिसून येत असल्याचे के.चंद्रशेखर राव म्हणाले.
केंद्र सरकार ची जर नीती चांगली असेल तर उपलब्ध पाणी प्रत्येकाला पिण्यासाठी पाणी देऊ शकते मात्र त्यांची इच्छा नसल्याचे येथील सरकार वरूनही दिसून येत आहे. भारताची राष्ट्रीय जल नीती बंगाल च्या खाडी मध्ये फेकून द्यायला पाहिजे आणि नवी जलनीती ची निर्मिती करायला पाहिजे. सिंचन, पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकत नाही हि मोठी शोकांतिका असल्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले. थर्मल पावर बनविण्यासाठी ३६१ बिलियन टन एव्हढा कोळसा उपलब्ध आहे. तरीही केंद्र सरकारची इच्छा शक्ती वीज निर्मितीसाठी दिसून येत नाही.
भगीरथ भालके यांचा बीआरएस मध्ये प्रवेश….
पंढरपूर, मंगळवेढा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी तेलंगणाचे मुखमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भालके यांनी बीआरएस मध्ये प्रवेश केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी मी बीआरएस मध्ये प्रवेश केल्याचे भगीरथ भालके यांनी सांगितले.