कागदोपत्री हॉस्पिटल दाखवून मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा घातला घाट ; मंत्री अब्दुल सत्तारांचा प्रताप ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२०  

नागपूर | अल्पसंख्यांक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे २०१८ पासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नसतानाही कागदोपत्री हॉस्पिटल दाखवून मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा मंत्री अब्दुल सत्तार यांनी घाट घातल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने तक्रार केली तर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे युतीच्या काळात ही हुकुमशाही सुरू असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात केला. भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पक्ष कार्यालया समोर संरक्षक भिंत बांधण्यासाठी सिल्लोड नगरपालिकेचा वापर केला गेला. या हुकुमशाही प्रवृत्ती बाबत पोलिस तक्रार ही दाखल करत घेत नसून भाजप पक्षही त्यांना कसलीही सुरक्षा देत नसल्याची टीकाही त्यांनी केली. खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी रुग्णालय सुरू असणे आवश्यक आहे.परंतु रुग्णालय नसताना कागदोपत्री दाखवून ३०० खाटाचे वैद्यकीय महाविद्याल व ६० खाटांचे आयुर्वेदिक रुग्णालयास परवानगी घेतली जात असल्याची माहिती ही अंबादास दानवे यांनी दिली.  तसेच शिक्षक पात्रता भरतीत ही या मंत्र्याचे नाव आले असल्याचा उल्लेख सुद्धा त्यांनी केला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!