आपल्या हृदयात शिवालय बनवा ; तुमच्या घरी कोणाला बोलावण्याची गरज नाही ; पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवभक्तांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर | दि.४ : प्रेमाच्या बळावर तुम्हाला जग जिंकता येईल, रडून कधीच शिव मंदिर तसेच शिवमहापुराण कथेत येऊ नका असे आवाहन करत दुखः निभवण्याचा प्रयत्न करा, सदैव आनंदी रहा आणि आपापल्या हृदयात शिवालय बनवा, तुमच्या घरी कोणाला बोलावण्याची गरज नाही असे ठामपणे आज शनिवारी (दि.३) शिव महापुराण कथेत पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांनी सांगितले. आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या वतीने श्रीरामचंद्र मठ येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथेत भाविक भक्तांनी भजन संगीतात शिव महिमा अनुभवला.
शिवमहापुराण कथे प्रसंगी पालक मंत्री संदीपान भुमरे यांनी प्रदीप मिश्रा यांचे स्वागत केले. कथा सांगताना पंडित मिश्रा म्हणाले की, आमचा सनातन धर्म कोणाच्या घरात आग लावण्याचे नाही शिकवत. जेथे जाईल तिथे सनातन धर्म हा अग्रस्थानी आहे. “दुवा साथ चलेगी तो दवाई की जरुरत नहीं पडेगी” असा गुरुमंत्र देत त्यांनी मोबाईल जेवढे काम नाही करणार तेवढे काम तुमच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता आणि एक स्मितहास्य काम करेल असे सांगितले.
यावेळी मंगला कोळी, चीचोली, जिल्हा जळगाव यांचा मुलगा लहानपणापासून म्हणायचा की जर एव्हढी मोठी शक्ती शिव महापुराण कथेत असेल तर मला पोलिस ची नौकरी शिवशंकराने द्यावी. मंगला यांनी पत्राद्वारे हे सांगितल्यावर पंडित प्रदीप मिश्रा यांनी १८ व्या वर्षी त्यांचा मुलगा पोलिस भरती झाला. आणि आज रायगड जिल्ह्यात त्याची नियुक्ती झाली. ७ आणि ९ वर्षात आई वडील होण्याचे सुख आम्हाला भगवान शंकराच्या कृपेने मिळाल्याचा अनुभव पत्राद्वारे पंडित मिश्रा यांनी भक्तांना वाचून दाखविला. यावर भक्तांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

शिवभक्ती करा….
आयुष्याचा काही भरवसा नाही, कधी श्वास बंद होईल हे कुणाला माहीत नाही. त्यामुळे उपवास करा, पोटभरून फराळ करा आणि शिवभक्ती करा असे वचन पंडित मिश्रा यांनी भक्तांना दिले.
ऋषिकेश जैस्वाल, आणि निखिलेश जैस्वाल यांचे कौतुक
आपण सर्वजण इथे कथा आईकत आहात सर्व जण सावलीत बसलेले आहे, मात्र ऋषिकेश आणि निखिलेश जैस्वाल हे बाहेर एवढ्या उन्हात भक्तांची काळजी घेत आहेत, त्यांची सेवा करत आहेत. आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या सारखे मुले सर्वांनी मिळो अशी प्रार्थना करत जैस्वाल कुटुंबाचे पंडित मिश्रा यांनी कौतुक केले.

“नाटक आणि चित्रपटात दाखविल्या सारखे प्रेम करू नका…*
दान, भजन, वैराग्य (भजन, स्मरण) आणि आत्महत्या एकाच झटक्यात होतात.
आपल्या जीवनात सात दिवसाला खुप महत्व आहे. लहानपण, किशोर, तारुण्य, आणि म्हातारपण ही आपल्या जगण्याची अवस्था आहे. त्यामुळे जे काही चांगले करता येईल ते करा. असा सल्ला पंडित मिश्रा यांनी शिव पुराण कथेत उपस्थित लाखो भक्तांना दिला.
स्री ही सीता, अहिल्या, सावित्री बनुनच राहू इच्छिते…
छञपती संभाजी महाराजांपेक्षा अधिक कष्ट, यातना, आणि अडचणी त्यांच्या धर्मपत्नी येसूबाई यांनी सोसल्या. स्री ही सीता, अहिल्या, सावित्री बनुनच राहू इच्छिते. ती कधीच गौतम बुद्ध बनण्याची इच्छा ठेवत नाही. कारण तिला मर्यादा ओलांडल्यानंतर समाज सहजतेने स्वीकारत नाही. आणि गौतम बुद्धासारखे शांत, संयमी राहूनही तिला जमणार नाही. तिला आपल्या हक्कांसाठी लढावेच लागेल.
महाराष्ट्रातील पूर्ण मुलींवर माझा विश्वास…
जी मुलगी आपल्या वडिलांना कन्या दान करण्याचा मान देते ती मुलगी जगात सर्वात सुखी. मुलगी जर चुकीच्या मुलासोबत गेली तर तिला कोणीच स्वीकारत नाही हे वास्तव आहे. आपल्या आई वडिलांची मान खाली घातली तर तुम्हाला कधीच मोक्ष मिळणार नाही. असे सांगून त्यांनी मला महाराष्ट्रातील पूर्ण मुलींवर विश्वास आहे. पूर्ण भारताच्या तरुणीने संकल्प करावा की हा आपला सनातन धर्म सोडणार नाही.
आजचा रंग “पोपटी”
शिवमहापुराण कथेचे सात रंग निर्धारित केले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात रंगांना एक वेगळे महत्त्व आहे. ज्यामुळे एक नवी ऊर्जा निर्माण होते अशी अध्यात्मिक भावना आहे त्यानुसार आज रविवारी (दि.४) गुलाबी रंग असून भाविकांनी आपापल्या परंपरागत वेशभूषेत कथा स्थळी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले.