चिकलठाण्यात रौप्य महोत्सवी अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ

औरंगाबाद | चातुर्मास समाप्ती निमित्ताने चिकलठाणा येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंडळाच्या वतीने यंदा रौप्य महोत्सवी अखंड हरीनाम सप्ताह व संगीत श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत चिकलठाणा येथील श्री संत शिरोमणी सावता मंडळ च्या सभागृहात करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष मदनराव देवराम कारभारी नवपुते यांनी दिली.
या रौप्य महोत्सवाची सुरुवात मंगळवारी एकतुनी चे मठाधिपती सुरजगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली. याप्रसंगी हभप किसन महाराज जाधव, हभप तुकादास काटे गुरुजी, हभप निवृत्ती घोडके, हभप अनिता पवार, माजी महापौर बापू घडामोडे, माजी सभापती दिलीप थोरात, माजी नगरसेवक रवी कावडे, माजी नगरसेविका ज्योती नाडे, संस्थापक अध्यक्ष मदनराव देवराम कारभारी नवपुते, मनोहर लोंढे, सुनील गाजरे, सोमीनाथ मोटे, कारभारी कावडे, किसन नवपुते, सुखदेव धोत्रे, दामोधर करवंदे, भागीनाथ नवपुते, ज्ञानेश्वर जाधव, नवनाथ कावडे, कारभारी गोटे, मारोती धोत्रे यांची उपस्थिती होती. ज्ञानेश्वरी परायानाने अखंड हरीनाम सप्ताहास सुरुवात करण्यात आली. या पारायण सोहळ्यात १२१ महिला, तरुण-तरुणी, जेष्ठ मंडळी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणा च्या अध्यायाचे वाचन केले. मदन नवपुते कुटुंबाच्या वतीने एक हजाराहून अधिक ज्ञानेश्वरी ग्रंथाचे यावेळी प्रसाद म्हणून दान करण्यात आले. या रौप्य महोत्सवी अखंड हरीनाम सप्ताहात दररोज काकडा भजन, विष्णू सहस्रनाम, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन, हरिपाठ, संतपूजन, महाआरती तसेच संगीत श्रीराम कथा होणार असून ८ नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर भव्य श्रीराम कथा ग्रंथ मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात येणार आहे. श्री क्षेत्र नाशिक येथील रामकथा प्रवक्ते रामायानाचार्य हभप भास्कर महाराज रसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने या रौप्य महोत्सवाची सांगता होणार आहे. या श्री संत शिरोमणी सावता मंडळ च्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरीनाम सप्ताहास हरी भक्त, भजनी मंडळ तसेच वारकरी संप्रदायाने सहभागी व्हावे यासे आवाहन संस्थापक अध्यक्ष मदनराव देवराम कारभारी नवपुते व श्री संत शिरोमणी सावता मंडळ, चिकलठाणा च्या वतीने करण्यात आले आहे.
ज्ञानेश्वरी परायानाने अखंड हरीनाम सप्ताहास सुरुवात करण्यात आली. या पारायण सोहळ्यात १२१ महिला, तरुण-तरुणी, जेष्ठ मंडळी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणा च्या अध्यायाचे वाचन केले. मदन नवपुते कुटुंबाच्या वतीने एक हजाराहून अधिक ज्ञानेश्वरी ग्रंथाचे यावेळी प्रसाद म्हणून दान करण्यात आले.