गुलाबी रंगाने सजले शहर ; जाहीर सभेतून केसीआर फुंकणार राजकारणाचे रणशिंग

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २४  

छत्रपती संभाजीनगर | तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या जबिंदा मैदानावरील जाहीर सभेच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर गुलाबी रंगाने सजले असून त्यांच्या स्वागतासाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीने वर्तुळाकार जाहिरात फलकांनी पाहणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधले आहे. आज (दि.२४) सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या सभेसाठी मराठवाड्यासह तेलंगन राज्यातील बीआरएस चे पदाधिकारी शहरात दाखल झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील सभेनंतर छत्रपती संभाजी नगर येथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव  यांची हि तिसरी सभा होत आहे. सभेसाठी गेल्या दोन आठवड्यापासून तेलंगना राज्यातील खासदार, आमदार, नगरसेवक तसेच पदाधिकारी ठाण मांडून होते. भारत राष्ट्र समिती मध्ये जाहीर प्रवेश करण्यासाठी या नेत्यांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे आज किती आणि कोण कोण राजकीय मराठवाड्यातील नेते, आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक तसेच कार्यकर्ते या पक्षात जाहीर प्रवेश करतील याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जबिंदा मैदानावर सभेसाठी भव्य व्यासपीठ तसेच समर्थकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. सभेच्या तयारीसाठी भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र प्रभारी तथा अर्मुर विधानसभा मतदार संघाचे आमदार जीवन रेड्डी, जहिराबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार बी.बी. पाटील, आमदार शकील अहमद, भारत राष्ट्र किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस हिमांशू तिवारी, राज्याचे नेते प्रवीण जेठेवाड, नव्याने पक्षात प्रवेश केलेले मौलाना अब्दुल कदीर, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, शंकर अण्णा धोंडगे, अण्णासाहेब माने पाटील, अभय पाटील चिकटगावकर, दिलीप अण्णा गोरे, शिवराज बांगर, संतोष माने पाटील, सुनील धोंडगे, नागनाथ घीसेवाड हे पुढाकार घेत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!