अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांचा युवामित्र फौंडेशनच्या वतीने सत्कार

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २६
छत्रपती संभाजीनगर | स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित “शिवपुत्र संभाजी” या महानाट्याचा प्रयोग शहरात होत असून छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार आणि कर्तुत्व सर्वसामान्य माणसापर्यंत आपल्या सशक्त अभिनयातून पोहचविणारे व शिवपुत्र संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा सत्कार युवामित्र फौंडेशनच्या वतीने रविवारी (दि.२५) करण्यात आला.
यावेळी युवमित्र फौंडेशन चे अध्यक्ष सचिन अंभोरे, भास्कर निकाळजे, गणेश पुजारी, सुजित ताजने, अमोल वाघुले, कृष्णा लोखंडे, सिद्धेश्वर थोर, भानुदास मते, आकाश सावंत, आदींची यावेळी उपस्थितीत होती. मराठी अस्मितेसाठी व मराठी नाटकांसाठी डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवपुत्र संभाजी या महानाट्याद्वारे मराठी प्रेक्षक पुन्हा रंगभूमीकडे वळविला आहे. मराठी कलावंताना रंगभूमी उपलब्ध करून देत त्यांनी कलावंताना प्रोत्साहन दिल्याबद्दल हा सत्कार युवामित्र फौंडेशन च्या वतीने करण्यात आला. शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाचे शुक्रवारी (दि.२३) रेकॉर्डब्रेक गर्दीत बीड बायपास येथील जबिंदा लॉन्स येथे सादरीकरण झाले. यावेळी छत्रपती संभाजीनगरकरांनी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची धगधगती जाज्वल्य अंगारगाथा अनुभवली. तब्बल दहा वर्षानंतर शहरात शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सादर होत असून शाळेतील मुलांना स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास प्रत्यक्षात कळावा यासाठी या महानाट्याचे आयोजन करण्यात आल्याची भावना यावेळी अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.