तेवीस वर्षानंतर पुन्हा भरली आठवणींची शाळा 

ज्ञानदीप विद्यालाच्या २००१-२००२ वर्षातील वर्गमित्र-मैत्रिणींचा स्नेहमेळावा उत्सहात

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१६ 

छत्रपती संभाजी नगर | प्रकाशनगर, सिडको एन-२, येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या २००१-२००२ वर्षाच्या इयत्ता दहावीतील वर्ग मित्र मैत्रिणी तब्बल २५ वर्षानंतर रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा शनिवारी (दि.१५) प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहात आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेतील तेव्हाचे प्रत्येक क्षण आठवत शाळेतील शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

प्रतिकूल परिस्थिती शाळेत शिक्षण घेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापले करिअर घडवले. कोणतीही शिकवणी नसताना शाळेत शिक्षकांनी प्रचंड मेहनतीने प्रत्येकाला शिकवून दहावी उत्तीर्ण केले. त्यांचे हे ऋण व्यक्त करण्यासाठी ज्ञानदीप विद्यालयाच्या २००१-२००२ वर्षाच्या इयत्ता दहावीतील वर्ग मित्र मैत्रिणी तब्बल २३ वर्षानंतर रौप्य महोत्सवी स्नेहमेळाव्यात आपापल्या भावना व्यक्त केल्या. स्नेहमेळाव्याचे मिलिंद मगरे आणि संतोष हिवराळे यांनी नियोजन केले. स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक सुरेश भदरगे यांनी तर सूत्रसंचालन दिपाली खोत यांनी केले. यावेळी २००१-२००२ वर्षाच्या इयत्ता दहावीतील अर्चना चव्हाण, शुभांगी भिंगारदेव, अर्चना खंदारे, नजमा शेख, भाग्यश्री अग्रवाल, नसीम बेग, वसुंधा फडके, पौर्णिमा मोरे, स्वाती गायकवाड, ललिता राऊत,  प्रमोद साळुंके, संजय मानकर, रविंद्र चापाईतकर, पंकज सदांशीव, गौरख चौरे, सचिन बकाल, माधव वकटे, आनंद नरवडे, संतोष रगडे, सुभाष डरफे, सचिन राठोड, सतीश कुंभारे, महेश रोमन, शैलेश जाधव, उमेश भुजबळ, सुशील लाखोले, गौतम पनाड, संजय भालेराव, संतोष थांगे, शशांक भिंगारदेव, अनिल पटेकर, यांची यावेळी उपस्थिती होती. शाळेत एकत्र बसून मधल्या सुट्टीत खाल्लेला डब्बा, अभ्यास न केल्याने शिक्षकांकडून मिळालेली शिक्षा, आणि यामुळे परिस्थितीशी जुळवत मिळालेले यश विद्यार्थ्यांनी डोळ्यांच्या कडा पाणावत सांगितले. सर्वसामान्य कामगार, कष्टकऱ्यांची मुले-मुली शिकवून ज्ञानदीप विद्यालयातील प्रत्येक शिक्षकांनी सर्व विद्यार्थी सक्षम बनवली. याचा सार्थ अभिमान यावेळी वर्गमित्र-मैत्रिणीनी व्यक्त केला. शाळेत दहावीत असताना मुलांना शिकवणारे जोगदंड सर यांनी लेझीम तसेच ढोल पथकातून विविध खेळाची गोडी कशी लावली याबाबत आठवणी सांगितल्या. तर  रमेश आकडे म्हणाले कि, २००१-२००२ या वर्षात असणाऱ्या दहावी च्या विद्यार्थ्यांनी आपले विश्व शून्यातून उभे केले. आज विविध पदावर ते कार्यरत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. शाळेत एमसीसी च्या माध्यमातून विद्यार्थ्याला चांगली शिस्त लावता आली. त्यामुळे आज प्रत्येक जन इतरांना प्रेरणा देणारे कर्तुत्व सिद्ध करत आहेत. प्रत्येकाची प्रगती होवो आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातून आजच्या पिढीतील गरीब विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी सेवा घडो असे आवाहन त्यांनी यावेळी माजी विद्यार्थ्यांना केले.तर गणित आणि विज्ञान शिकवणारे विनायक पवार म्हणाले कि, विद्यार्थ्यांना गणित शिकवताना त्यांच्यावर संस्काराचे गणित जुळवता आले. विज्ञान शिकवताना त्यांना आयुष्याचा दृष्टीकोन दिला आणि विद्यार्थ्यानी तो आपल्या भावी आयुष्यासाठी आमलात आणला याचे समाधान मला वाटते. तर श्यामसुंदर भालेराव यांनी त्यावेळी मराठी कविता शिकवतांना वाचन आणि साहित्याची गोडी कशी लावली हे सांगितले. तर कला शिक्षक कैलास झिने यांनी अशी पाखरे येती हि कविता सादर करत शाळेतील चित्रकलाबाबत आठवणी व्यक्त केल्या. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या आणि कलात्मक विचारांचे रंग भरता आले याबाबत समाधान व्यक्त केले तर कैलास गांगुर्डे यांनी शाळेतील स्नेहसंमेलनात विविध नृत्याची कशी तयारी केली जात होती याबाबाबत आठवणी सांगितल्या.

यावेळी २००१ -२००२ वर्षाच्या इयत्ता दहावीतील इयत्ता दहावीतील वर्गमित्र-मैत्रिणींच्या वतीने व्ही. टी.जोगदंड, रमेश आकडे, विनायक पवार, श्रीमती योगिता पाटील,व्ही. बी.राजपूत, के.एम.पगारे, श्यामसुंदर भालेराव,डी.  व्ही. इंगळे, कैलास गांगुर्डे, श्रीमती एल.के रोठे, श्रीमती एस.ई.पंचोळे, पंढरीनाथ खंदारे, के.आर .गोस्वामी, ए .ए .ढगे, आर .टी. बनकर, व्ही. सि.हिवाळे, एस.एस.मगरे, डी.एस.पगारे, कलाशिक्षक कैलास झिने, डी.पी.महाजन,आर. के .चव्हाण ए .के. कोल्हे, एस .के .निकम, पि.डी.पिवळ, एन .व्ही. भालेराव,श्रीमती डि.ए घागरे, श्रीमती सि.एस. नायर, श्रीमती.एस.ए.जाधव, श्रीमती पि.एस. हिवराळे, सेवक श्री पिवळे, श्री कोल्हे या शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करत शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

फुल हार रांगोळ्यांनी विद्यार्थ्यांचे केले स्वागत…

प्रारंभी शाळेच्या ग्राउंड वर सर्व २००१ -२००२ इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांकडून शिक्षक रमेश आकडे यांनी विद्यार्थ्यांची प्रार्थना, प्रतिज्ञा तसेच राष्ट्रगीत घेऊन वर्ग प्रवेश केला. शाळेच्या वतीने आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे फुल हार रांगोळ्यांनी स्वागत करण्यात आले. तेव्हाचे वर्गशिक्षक यांनी सर्वांची हजेरी घेऊन सर्व विद्यार्थ्यांना सूचना केल्या. पुन्हा वर्गातील शिकवणीचा तास आणि ते दिवस आठवून स्नेहमेळाव्यात प्रत्येकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!