उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने नवगाव येथे वृक्षारोपण
नवगाव ग्रामपंचायतच्या वतीने पर्यावरण संवर्धनार्थ उपक्रम

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.९
नवगाव , ता. पैठण | शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नवगाव ग्रामपंचायतच्या वतीने पर्यावरण संवर्धनार्थ रविवारी (दि.९) महानुभाव पंथाचे दत्त मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी संरपच किशोर चौधरी पाटील, उपसंरपच डॉ शरिफ पठाण, हभप इंगळे महाराज, ग्रामपंचायत सदस्य बबनराव गंवादे, गणेश औटे, गंगाधर साबळे, आमिर पठाण, आनंत लाड, परमेश्वर चौधरी, बबन भावले, रमेश काळे, विष्णू म्हस्के, नितीन पाचे, आखतर शेख, इरफान पठाण आदि उपस्थित होते.