गवळी कुटुंबियानी केले मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत ; ग्रामस्थांनी केले कौतुक

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.२
फुलंब्री | तालुक्यातील वडोद बाजार येथील गवळी कुटुंबियानी आपल्या घरात जन्माला आलेल्या मुलीच्या जन्माचे स्वागत जल्लोशात करत सुखद धक्का दिला.यावेळी आपल्या कन्यारत्नाची फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच फुलांच्या रांगोळ्यांच्या पायघड्या टाकत फुलांचा वर्षाव करीत धुमधडाक्यात स्वागत केल्यामुळे उपस्थित ग्रामस्थ व नातेवाईक भारावून गेले होते.
मुलगी झाली म्हणून नाराज होणारा वर्ग आता खेड्यात सुद्धा राहिलेला नाही.फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील व्यावसायिक रतन गवळी यांचा मुलगा पत्रकार उमेश रतन गवळी व सून कोकिळा उमेश गवळी त्यांना नुकतेचं कन्यारत्न प्राप्त झाले.त्यामुळे अती आनंद झालेल्या गवळी कुटुंबाने स्त्री जन्माचे अनोख्या पद्धतीने घरात स्वागत करताना रांगोळ्याच्या पायघड्या,औक्षण व मिठाईचे वाटप करून आपल्या कन्येचे स्वागत केल्याने वडोद बाजार येथिल ग्रामस्थांसह नातेवाईक व मित्रपरिवाराचेही डोळे दिपून गेले होते.मुलगा-मुलगी असा भेद न करता.बेटी बचाव.बेटी पढाव.समाजात एक चांगला संदेश देण्याचे काम यानिमित्ताने रतन गवळी.लताबाई गवळी. उमेश गवळी.कोकिळा गवळी.शुभम गवळी.राणी गवळी. वैशाली किशोर घायतिलक. जयश्री संतोष अहिरे.सुनिता तुळशीराम साळवे.कुटुंबातील सदस्यांनी केले आहे.