गायरान जमीन प्रकरणी मंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यावा ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २६  

नागपूर |  एकर गायरान भूखंड बेकायदेशीरपणे देऊन पदाचा दुरुपयोग करून निर्णय घेतल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा व त्यांची चौकशी करण्याची मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली.२८९ अनव्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदर प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास आणले.

उच्च न्यायालय नागपूर बेंच येथे २२ डिसेंबर २०२२ ला एक आदेश दिले. १७ जून २०२२ रोजी वाशीम येथील ३७ बिंदूं १९ एकर गायरान जमीन बेकायदेशीररित्या तत्कालीन राज्य महसूलमंत्री व आताचे कृषीमंत्री यांनी दिली. या संदर्भात १२ जुलै २०११ च्या राज्य शासनाच्या निर्णयाकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि आपल्या पदाचा दुरुपयोग करून ३७ एकर गायरान जमीन बेकायदेशीरपणे देण्याचा निर्णय सत्तार यांनी घेतला.

एकूण ५ प्रकरण ही न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाचे आदेश डावलून सत्तार यांनी स्वतः निर्णय घेतल्याचे दाखले दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

मंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीररित्या निर्णय घेतलेली एकूण ५ प्रकरण खालीलप्रमाणे

३७ एकर गायरान भूखंड बेकायदेशीररित्या दिली.

सविता थोरात यांची मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद रत्नागिरी कोकण प्रादेशिक विभागिय आयुक्त या प्रकरणातही कोकण विभाग आयुक्त व अधिकारी यांना अज्ञानात ठेऊन सत्तार यांनी निर्णय घेतला.

तसेच संभाजीनगर येथील जयेश इन्फ्रा सावंगी नावाच्या  कंपनीला सत्तार यांनी अधिकार नसतानाही नियमबाह्य व बेकायदेशीर आदेश दिले होते.

छत्रपती संभाजीनगर मध्ये ही अधिकार नसताना वाळू ठेकेदार यांना वाळूपत्ता बदलून देण्याचं काम केलं.

छत्रपती संभाजीनगर जिन्सी येथील कृषी बाजार समितीच्या जागेबाबत ही सत्तार यांनी कार्यक्षमतेबाहेर जाऊन चुकीचा निर्णय दिला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!