नवजीवन वाद्य पथक ठरले प्रथम पारितोषिकांचे मानकरी ; द्वितीय मोरया… नावातच सर्व काही वाद्य पथक तृतीय आम्ही शिवपुत्र वाद्य पथकांनी मारली बाजी

गणपती बाप्पा मोरया चा जयघोष ; श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे लक्षवेधी आयोजन ; धुरंधर अविस्मरणीय अशा ढोल वादन स्पर्धेत तरुणाईचा उदंड प्रतिसाद
लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १५
छत्रपती संभाजीनगर | महाराष्ट्रातील सण उत्सवाची परंपरा, संस्कृती जोपसणाऱ्या भव्य धुरंधर, अविस्मरणीय अशा ढोल वादन स्पर्धेचे शतक महोत्सवी श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने शनिवारी (दि. १४) संभाजी पेठेतील जिल्हा परिषद मैदानावर आयोजन करण्यात आले होते. मराठमोळी वेशभूषा, डोळ्यांची पारने फेडणारी विद्युत रोषणाई… ढोल ताशांचा निनाद आणि गणपती बाप्पा चा जय घोष करत तरुण-तरुनींचा सहभाग असलेल्या ढोल पथकांनी आसमंत निनादुन टाकला. या ढोल स्पर्धेतील विजेत्या ढोल पथकांना प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे ५१ हजार, ३१ हजार, २१ हजार पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत प्रथम नवजीवन वाद्य पथक द्वितीय मोरया… नावातच सर्व काही वाद्य पथक तृतीय आम्ही शिवपुत्र वाद्य पथक विजयाचे मानकरी ठरले.
यावेळी श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे कार्याध्यक्ष सुमित खांबेकर, अनिकेत निल्लावार, प्रशांत जोशी, ज्ञानेश्वर इंगळे, विशाल दाभाडे, संदीप शेळके, अनिकेत पवार, शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रतिभा जगताप, सौ. बोरसे, काजल ऋषिकेश जैस्वाल यांची उपस्थिती होती. तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कुणाल तायल,निखिल चव्हाण, संजय राखुंडे, सौरभ यादव, शुभम अग्रवाल,विनायक वेंन्नम,अक्षय लिंगायत, राजू मन्सूरी , आदित्य शर्मा, अजिंक्य सुरळे, ऋत्विक अग्रवाल, भूषण इंगळे, देवा अडणे, प्रतीक गायकवाड, विशाल काकडे, स्वप्नील उपाध्याय, सचिन लिला सुखदेव अंभोरे, सुमित दंडूके, अनिल सोनवणे यांनी पुढाकार घेतला. या स्पर्धेचे परीक्षण उमेश खैरनार (नाशिक), अमोल नाईक (मुंबई), विक्रांत सालने (पुणे) यांनी केले तर स्पर्धेचे सूत्रसंचालन लोकेश कुमावत, सचिन लिला सुखदेव अंभोरे, विशाल गादिया यांनी केले.
आज भव्य कुस्त्यांची दंगल…
शतक महोत्सवी श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने आज रविवार (दि. १५) रोजी संभाजी पेठेतील जिल्हा परिषद मैदानावर दुपारी ३ वाजता महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल मैदानी कुस्त्यांची भव्य दंगल स्पर्धा होणार आहे. सण उत्सवाची परंपरा, संस्कृती जोपसणाऱ्या भव्य कुस्त्यांची दंगल अनुभवण्यासाठी सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आवाहन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष ऋषिकेश सरोज प्रदीप जैस्वाल यांनी केले आहे.
उद्या भव्य चित्रकला स्पर्धा….
शतक महोत्सवी श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने उद्या सोमवार (दि. १६) रोजी भव्य चित्रकला स्पर्धेचे सकाळी ११ वाजता श्री गणेश महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आली असून १ ली ते १० वी अशा चार वयोगटात या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी धनश्री उपाध्ये, मो. 9834509006 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री गणेश महासंघ उत्सव समिती चे अध्यक्ष ऋषिकेश सरोज प्रदीप जैस्वाल यांनी केले आहे.