छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त विविध शालेय स्पर्धांचे आयोजन ; सहभाग नोंदविण्याचे आवाहन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.७ 

छत्रपती संभाजी नगर | महानगरपालिकेच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय स्पर्धांचे आयोजन दिनांक शुक्रवार (दि.८) पासून करण्यात आले आहे.  महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक महोदय यांच्या आदेशानुसार यावर्षी मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त मनपा शाळेतील विद्यार्थ्यां सोबत खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्याना सुद्धा सहभाग घेता येणार आहे व विविध बक्षिसे जिंकता येणार आहेत.

८ डिसेंबर रोजी मनपाचा वर्धापन दिन असल्यामुळे शहरातील प्रत्येक शाळेमध्ये  गटनिहाय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. या स्पर्धेमधून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे गटनिहाय निवडून  विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाला नऊ तारखेला कळवायचे आहे व याप्रत्येक शाळेतील  प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची एकत्रित चित्रकला स्पर्धा महानगर पालिका स्तरावर दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी आठ वाजता सिद्धार्थ उद्यान येथे होणार आहे तसेच वकृत्व आणि निबंध स्पर्धा या महानगरपालिकेच्या दहा केंद्रीय शाळा स्तरावर दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहेत यासाठी आठ डिसेंबर पर्यंत जवळच्या केंद्रीय शाळेवर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे नोंदणी करावी आणि यामधील केंद्र स्तर समिती विद्यार्थ्यांची निवड करून महानगरपालिकेला कळविणार आहे आणि त्यामधून महानगरपालिका स्तरावरील समिती  प्राप्त गटातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडणार आहे तसेच शाळा स्तरावरच पथनाट्य करता यावे म्हणून यावर्षी विशेष म्हणजे इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी खुला गटांमध्ये पथनाट्य स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत याही स्पर्धा प्रथमता केंद्र स्तरावर होतील आणि केंद्रस्तरावरून प्रथम क्रमांक ने गटाची निवड करून मनपा स्तरावर त्याच्या स्पर्धा दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी होतील आणि त्यामधून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक निवडले जातील व प्रथम क्रमांक मिळवलेल्या गटाला महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य कार्यक्रमात सादरीकरण करण्यास संधी मिळणार आहे तसेच या स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीसांची रेलचेल ठेवण्यात आलेली आहे पथनाट्य मध्ये प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये आहे द्वितीय बक्षीस नऊ हजार रुपये आहे तृतीय बक्षीस सात हजार रुपये आहे व प्रोत्साहन बक्षीस पाच हजार रुपये आहे व  चित्रकला आणि निबंध स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस पाच हजार रुपये द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये आणि तृतीय बक्षीस दोन हजार रुपये आहे आणि वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस दोन हजार रुपये ठेवण्यात आलेले आहे व ही सर्व बक्षिसे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रम दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी संत एकनाथ रंगमंदिर येथे माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदय व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहेत तरी शहरातील सर्व  महानगरपालिकेच्या आणि खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध शालेय स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा असे आव्हान माननीय उपायुक्त नंदा गायकवाड आणि नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे व कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!