पेरियार ई व्ही रामासामी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या पुतळ्याचे अनावरण रविवारी

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ३०

छत्रपती संभाजी नगर | विसाव्या शतकातील महान विचारवंता पैकी एक विचारवंत म्हणजे पेरियार ई.वी. रामासामी होते. त्यांना व्होल्टेअर च्या श्रेणीतील तत्वज्ञ, विचारवंत, लेखक तसेच वक्ता मानले जाते. ज्यांच्या विचारांच्या आधारे भारतीय समाजाचे आणि भारतीय व्यक्तीचे संपूर्ण आधुनिकीकरण होऊ शकते, अशा भारतीय विचारवंत आणि विचारवंतांमध्ये ते आघाडीवर आहेत. म्हणूनच त्यांच्या विचारांना नव्या पिढीत रुजविण्यासाठी आणि त्यांचे स्मारक सदैव प्रेरणादायी राहावे यासाठी पेरियार ललईसिंह यांच्या जयंतीनिमित्त पेरियार ई.व्ही. रामासामी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या पुतळ्याचे अनावरण रविवार (दि.१) रोजी लिबरेशन पँथर पार्टीचे (VCK) राष्ट्रीय अध्यक्ष तथा तामिळनाडूचे खासदार मा. थोल थिरूमावल्लवण यांच्या हस्ते वाळूज येथील महाराष्ट्र महाविद्यालयात करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य सुनील वाकेकर, पेरियारचे अभ्यासक भीमराव सरवदे, मुकुल निकाळजे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या अनावरण सोहळ्याचे आयोजक प्राचार्य सुनील वाकेकर म्हणाले कि, महापुरुषांचे स्मारक हे आपल्या जगण्यासाठी प्रेरणा, उर्जा देतात. विसाव्या शतकातील महान विचारवंता पैकी एक विचारवंत म्हणजे पेरियार ई.वी. रामासामी यांचे महाराष्ट्रील पहिले स्मारक अम्ही उभारतोय. या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय शोषित समाज पार्टी, उत्तरप्रदेश चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मंत्री स्वामीप्रसाद मौर्य, आम आदमी पार्टी नवी दिल्लीचे मा. मंत्री राजेंद्र पाल गौतम, बिहारचे प्रतिपक्ष नेता तथा माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, तर प्रमुख उपस्थिती म्हणून सभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री प्रविणदादा गायकवाड, ओबिसी विचारवंत श्रावण देवरे, आंबेडकरी विचारवंत प्रा.डॉ. प्रकाश सिरसट, विद्रोही सांस्कृतिक चळवळचे पार्थ पोळके, बी.आर.एस.पी.चे संस्थापक अध्यक्ष सुरेश माने, बी.एस.पी.चे प्रदेश अध्यक्ष अॅड. सुनिल डोंगरे,  रॉ.कॉ.पा., श.प.चे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, बी. पँथर अध्यक्ष अनिल कुमार बस्ते, रॉ.कॉ.पा., श.प.चे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, निमंत्रक तथा मानव विकास व पुनर्निर्माण संशोधन संस्था, छत्रपती संभाजी नगरचे अध्यक्ष प्राचार्य सुनिल वाकेकर, बामसेफ, राष्ट्रीय संघटन सचिव  संजय मोहिते पी.एचडी. संशोधक-हैद्राबाद विद्यापीठ, आंबेडकर स्टुडंट असोसिएशन चे मा.गणेश्वर, पेरियार अभ्यासक भीमराव सरवदे, युवा आरपीआय (आ.) प्रदेश सचिव अमोल नरवडे राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल अन्वीकर,यांची उपस्थिती राहणार आहे. अनावरण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीचे  अॅड. विजय वानखेडे, विलास मगरे, उद्धव बनसोडे अरविंद कांबळे,  प्रविण जमधडे, भास्कर आढाव, राहुल मकासरे, सचिन बनसोडे, इंजि. मुकुल निकाळजे, मारुती साळवे, आकाश आव्हाड, कपिल मोरे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!