भव्य राज्यस्तरीय नमो चषक क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव कार्यालयाचे थाटात उद्घाटन ; तब्बल ५१ क्रीडा प्रकार होणार सादर ;  १२ ते २६ जानेवारी दरम्यान रंगणार विभागीय क्रीडा संकुलात महोत्सव ; खेळाडूंनी सहभाग नोंदविण्याचे स्वागताध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे आवाहन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.१०  

छत्रपती संभाजीनगर | घे पंगा खेळाचा, कर दंगा विजयाचा हे ब्रीद घेऊन छत्रपती संभाजीनगर क्रीडा मंच, छत्रपती संभाजीनगर ऑलिंपिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “नमो चषक -२०२४” आयोजन १२ ते २६ जानेवारी दरम्यान सूतगिरणी चौक जवळील विभागीय क्रीडा संकुलात करण्यात आले असून खेळाडूंसाठी महोत्सव संपर्क कार्यालयाचे मंगळवारी (दि.९) थाटात उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या या शहरात मोठा क्रीडा व. सांस्कृतिक महोत्सव घ्यावा अशी मागणी खेळाडूंच्या वतीने करण्यात येत होती, त्यांच्या मागणीनुसार शहरातला हा सर्वात मोठा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव पहिल्यांदाच होत असल्याचे सांगत प्रत्येक खेळाडूंनी मोठ्या संख्येने यामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. आमदार प्रदीप जैस्वाल, भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, तसेच उद्योजक राम भोगले यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. क्रीडा मंचावर महापौर बापू घडामोडे, माजी उपमहापौर राजू शिंदे, डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, हर्षवर्धन कराड, छत्रपती संभाजीनगर ऑलंम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, युवा मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष रामेश्वर भादवे, जालिंदर शेंडगे, राज वानखेडे, एस.पी.जवळकर, मनीषा मुंढे, आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.

योगासने, विशू, स्केटिंग, आदी खेळ प्रकार प्रातिनिधिक स्वरूपात कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सादर करण्यात आले. यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रीडा प्रशिक्षक, महोत्सव समन्वयक तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

उद्यापासून पासून उत्साहात सुरुवात…

छत्रपती संभाजीनगर क्रीडा मंच व छत्रपती संभाजीनगर ओलंपिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित नमो चषक क्रीडा महोत्सव ऑलिंपिक असोसिएशनच्या तांत्रिक सहकार्याने व ५१ विविध खेळांच्या क्रीडा संघटनेच्या मान्यतेने व सहकार्याने १२ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान पार पडणार आहे. महोत्सवात प्रामुख्याने खो-खो, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स, बास्केटबॉल, फुटबॉल, सायकलिंग, पॅरा ॲथलेटिक्स, पॅरा स्विमिंग, जिम्नॅस्टिक, तायक्वांदो,  टेबल टेनिस, बुद्धिबळ, ज्यूदो, योगासना, बॉडी बिल्डिंग, कराटे, कबड्डी, स्विमिंग, तलवारबाजी, लॉन टेनिस, स्विमिंग, रायफल शूटिंग, बॉक्सिंग, हॉकी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्केटिंग, जम्प रोप, हँडबॉल, गोल्फ, डॉजबॉल, टेनिस बॉल क्रिकेट, किक-बॉक्सिंग, सॉफ्टबॉल, रस्सीखेच, वूशु, ड्रॉप रोल बॉल, तेनिकोईत, ट्रायथलॉन, बेसबॉल, रग्बी, मल्लखांब, रोप मल्लखांब, आर्चरी, कॅरम, शूटिंग वॉलीबॉल, थ्रो बॉल, गदा युद्ध आणि एरोबिक्स जिमनॅस्टिक या स्पर्धा घेण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!