डॉ.आंबेडकर जयंती महासमितीच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ११
छत्रपती संभाजी नगर | डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासमितीच्या वतीने स्त्री शिक्षणाचे अग्रदूत, बहुजन, शेतकरी आणि कष्टकरी समाजाला शिक्षणाची दारे खुली करून देणारे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती दिनी संभाजी पेठ येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांती ज्योती सावित्री माता फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उत्सव महासमितीचे अध्यक्ष राजू शिंदे, कार्याध्यक्ष मिलिंद दाभाडे, समन्वयक गौतम खरात, गौतम लांडगे यांची उपस्थिती होती.