६ ऑक्टोबरला रंगणार राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचा “जलवा” ; प्रसिद्ध बॉलीवुड नृत्य दिग्दर्शक पराग टाकळकर, रोहन रोकडे करणार परीक्षण

स्पर्धकांना तब्बल तीन लाखाचे पारितोषिके ; सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव

देवेन करवाडे यांच्या वतीने आयोजन ; स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.३

छत्रपती संभाजीनगर | दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डी इव्हेंट कंपनीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय “जलवा-२०२३” या नृत्य स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, (दि.६) ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता, निराला बाजार येथील तापडिया नाट्य मंदिर येथे करण्यात आल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक देवेन करवाडे यांनी दिली.

“जलवा” हि राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा दोन वयोगटात होणार असून १४ वर्ष आतील व १५ वर्ष वरील स्पर्धकांना वयक्तिक, डूएट आणि समूह नृत्यात आपला सहभाग नोंदविता येईल. स्पर्धेत सहभागी विजेत्या स्पर्धकांना तब्बल तीन लाखाचे पारितोषिके देण्यात येणार असून विशेष बक्षिसेही देण्यात येणार आहेत. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध बॉलीवुड नृत्य दिग्दर्शक पराग टाकळकर, रोहन रोकडे हे करणार असून स्पर्धेत आपला सहभाग नोंदविण्यासाठी स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी ९९२२३२२५९९, ९३७१२२७६६७ या क्रमांकावर करावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!