शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १ 

 छत्रपती संभाजी नगर : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे नेहमीच सामान्य जनतेस मदतीसाठी धावून जातात.  त्यांनी केलेल्या मदतीबद्दल जनता देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे  आयोजन करुन  धन्यवाद व्यक्त करतात.  याचाच एक भाग म्हणून  त्यांच्या वाढदिवसानिमित्त अन्न दान,  गरजुंना वस्तू व रग वाटप,  गो – शाळेत मदत, अभीष्टचिंतन सोहळा अशा प्रकारे  विविध भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोमवार, १ जानेवारी रोजी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध सामजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने अन्नदान, गरजुंना ब्लॅंकेट वाटप,  गोशाळेत चारा वाटप, कीर्तन, कुस्ती स्पर्धा आदी कार्यक्रम आठवडाभर होणार आहे.

यामध्ये  सकाळी ८ वाजता खडकेश्वर महादेव मंदिर येथे   रुद्र अभिषेक.  सकाळी ९ वाजता गुरु गणेश गो शाळेत  बेगमपुरा शिवसेना शाखेच्या वतीने चारा वाटप.  सकाळी ११ वाजता गुलमंडी येथील  गो रक्षक गो शाळेत चारा वाटप. सकाळी ११ वाजता घाटी रुग्णालयात श्रीरंग  आमटे पाटील यांच्या वतीने फळ वाटप.  दुपारी १२ वाजता शांतीपुरा, नंदनवन काॅलनीत रग व फळ वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमास राजेश रानडे, जोजफ पाटोळे व शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. तसेच समीर जावेद कुरेशी यांच्या वतीने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कार्ड आभा कार्ड  कॅम्प शहरातील  १३ ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. दुपारी ३: ३०  वाजता मा. नगरसेवक विरभद्र गादगे यांच्या वतीने आविष्कार चौकात लाडुतुला.  संध्याकाळी ५ ते  ९ गुलमंडी येथील संपर्क कार्यालयात अभीष्टचिंतन सोहळा.

 मंगळवार, दिनांक २ जानेवारी :  २ जानेवारीला  सकाळी ७ वाजता बालाजी मंदिर शहागंज येथे महापुजा व भजन संध्या होणार आहे.

बुधवार, दिनांक ३ जानेवारी : सकाळी ९ वाजता राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत खो-खो स्पर्धा,  संध्याकाळी ६  वाजता बजाजनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर शिवलीला पाटील यांचा जाहीर हरीकीर्तन सोहळा,  तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर होईल. या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना तालुका अधिकारी विकी गिरे व मित्रमंडळी यांनी केले.  रात्री ८ वाजता शहागंज येथील बालाजी मंदिरात सुंदर कांड होईल.

गुरुवारदिनांक ४ जानेवारी : रोजी सकाळी ९ वाजता राजे संभाजी भोसले  सैनिकी शाळेत कब्बडी स्पर्धा ,   दुपारी १ वाजता राजा बाजार येथील बालाजी येथे दर्शन.

दिनांक ५  जानेवारी : मातोश्री वृद्धाश्रमात अन्न दान,

दिनांक ९  जानेवारी :राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने सकाळी  १० वाजता संत एकनाथ रंगमंदिरात  समुह नृत्य स्पर्धा, संभाजीनगर.

दिनांक १०  जानेवारी :संध्याकाळी पिशोर येथे ह.भ.प. इंदोरीरकर महाराज किर्तन.

या सर्व कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना छत्रपती संभाजीनगर आणि अभिष्टचिंतन सोहळा समितीने केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!