उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या वतीने भव्य रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिर

श्रीकृष्ण नगर येथे आयोजित शिबिरात शेकडो नागरिकांनी नोंदवला सहभाग

 लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.९

छत्रपती संभाजीनगर | राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर मध्य मतदार संघातील हडको परिसरातील श्रीकृष्णनगर येथे रविवारी (दि.९ ) भव्य रक्तदान आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, उद्घाटनानंतर आमदार जैस्वाल यांनी स्वतः नेत्र तपासणी करून या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला. आयोजन माजी नगरसेविका तथा उपमहानगरप्रमुख पदमाताई शिंदे यांनी केले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आणि दृष्टीसंबंधी त्रास असणाऱ्या नागरिकांना मोफत सेवा उपलब्ध करून देण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे. या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला. अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले, तर डोळ्यांचे विविध आजार, चष्म्याची गरज, मोतीबिंदू तपासणी यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी नेत्र तपासणी करून घेतली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!