स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या रास दांडिया ला पोलिसांचा विरोध ; संस्कृती जोपासणारे सण आम्ही साजरे करणारच प्रमोद राठोड यांचा ठाम निर्धार

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.११
छत्रपती संभाजी नगर | : गेल्या पंधरा वर्षापासून अखंड रित्या स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी एन ३, येथील शिवछत्रपती महाविद्यालय समोरील गरबा मैदानावर भव्य दिव्य स्वरूपात रास दांडियाचे कायद्याचे पालन करून आयोजन करण्यात येते. हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे आणि येणाऱ्या पिढीला त्याचा आदर्श ठरावा, हा प्रामाणिक हेतू स्वाभिमान क्रीडा मंडळाचा असतो. मात्र या परिसरात न्यायाधीश राहत असल्याचे कारण सांगून पुंडलिकनगर पोलिसांनी स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित रास दांडियाला परवानगी नाकारत विरोध केल्याचे त्यांनी आयोजक प्रमोद राठोड यांना सोमवारी (दि.९) दिलेल्या पत्रावरून स्पष्ट होत आहे.
स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने वर्षभर हिंदू संस्कृती जोपासणारे विविध उपक्रम राबविण्यात येतात. विविध सणाचे संस्कृती आणि परंपरा जोपासत कायद्याच्या चौकटीत राहून आयोजन व्यापक स्वरूपात केले जाते. ज्यामध्ये सर्व धर्मातील कुटुंबाचा सहभाग असतो मात्र पुंडलिक नगर पोलिसांचा विरोध हा हिंदू सण उत्सवावरच का असा प्रश्न परवानगी नाकारण्यावरून आणि उपस्थित होत आहे. यामुळे दुर्गा भक्तामध्ये व दांडिया प्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त केल्या जात आहे. संस्कृती जोपासणारे सण आम्ही साजरे करणारच असा ठाम निर्धार यावेळी प्रमोद राठोड यांनी व्यक्त केला.