९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन
विचारप्रवर्तनाचे काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होईल ; मुख्यमंत्र्यांचा विश्वास

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ३१
दिल्ली | दिल्लीतील महराष्ट्र सदनातील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.३१) करण्यात आले. २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान राजधानी दिल्ली मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाची उत्सुकता संपूर्ण मराठी साहित्य रसिक, वाचक, लेखक, कवी तसेच विचारवंतामध्ये असून राजधानी दिल्ली मध्ये हा सोहळा होत असल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, मला अतिशय आनंद आहे की, दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालयाचे उदघाटन महाराष्ट्र सदन येथे आपण केले आहे. जे साहित्य संमेलन होत आहे. जगभरातील मराठी माणसाच्या अभिमानाची हि बाब आहे. देशाच्या राजधानीत अतिशय भव्य स्वरुपात हे संमेलन होत आहे. या संमेलनासाठी ७० हून अधिक लोक येथे रात्र दिवस हे संमेलन यशस्वी होण्यासाठी काम करत आहेत. कार्यवाह मुरली मोहळ हे कार्यवाह म्हणून या संमेलनासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच या राजधानी दिल्लीत हे संमेलन होत आहे. आणि ते भव्य दिव्य आणि यशस्वी झालेच पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनीही या संमेलनासाठी येण्यास होकार दिला आहे. अतिशय चांगल असे भव्य दिव्य हे साहित्य संमेलन होत आहे. विशेषतः मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्या नंतर हे पहिलं साहित्य संमेलन होत असल्याने तमाम मराठी जगता मध्ये याबद्दल खूप उत्सुकता, उत्कंठा आहे. विचारप्रवर्तनाचे काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होईल असा मला विश्वास असल्याची भावना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.