आंबेडकर जयंती महासमितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे आज उद्घाटन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. ९
छञपती संभाजीनगर | निराला बाजार, ओल्ड केएफसी बिल्डिंग, मोतीवाला कॉम्प्लेक्स येथे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव महासामितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते आज रविवार रोजी (दि.९) सायंकाळी ५ वाजता होईल. अशी माहिती नवनर्वाचित अध्यक्ष राजू शिंदे व कार्याध्यक्ष मिलिंद दाभाडे, कोषाध्यक्ष राजू आमराव समन्वयक गौतम खरात, गौतम लांडगे, किशोर थोरात यांनी दिली.
मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, तर विशेष निमंत्रित म्हणुन माजी मंत्री गंगाधर गाडे, विधीज्ञ बी. एच. गायकवाड, दोलत खरात, यांची उपस्थिती राहील. केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा.इम्तियाज जलील, माजी खा. चंद्रकांत खैरे, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, आमदार संजय शिरसाट, सतीश चव्हाण, प्रदीप जैस्वाल, विक्रम काळे, प्रशांत बंब, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, उदयसिंग राजपूत, माजी आमदार डॉ.कल्याण काळे, एम. एम.शेख, सुभाष झांबड, किशनचंद तणवाणी, पृथ्वीराज पवार, विनोद पाटील, अभिजित देशमुख, राजेंद्र जंजाळ, प्रशांत तार्गे, माजी महापौर नंदकुमार घोडले, शिरीष बोराळकर, संजय केणेकर, डॉ. भालचंद्र कानगो, सतनामसिंग गुलाटी, ख्वाजा शर्फोद्दिन, सुमित खांबेकर, बापू घडामोडे, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय, मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आदींची प्रमूख उपस्थिती राहील.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांची १३२ वी जयंती यंदा समाजाभिमुख विविध उपक्रमांनी येत्या १४ एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार असून यानिमित्ताने विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजी नगरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या छत्रपती संभाजी नगर शहरातील भीमजयंतीचा जन्मोत्सव सोहळा यावर्षी अविस्मरणीय ठरणार आहे. हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात क्रांती चौक तसेच भडकल गेट येथे साजरा करण्यात येणार असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासमिती चे नवनिर्वाचित अध्यक्ष राजू शिंदे यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन युवा समितीचे कमलेश चांदणे, डॉ. कुणाल खरात, मिल्लू चावरिया, संघर्ष सोनवणे, आनंद लोखंडे, विशाल दाभाडे, विनोद साबळे, सचिन शिंदे, अप्पासाहेब किर्तीशाही, सुहास शिंदे, रोहित सोळसे, विजय वाहुळ, दिनेश चांदणे योगेश काकडे, सचिन अंभोरे, यांनी महासमितीच्या वतीन केले आहे.