पिसादेवीत पाच दिवसीय भव्य शिवजन्मोत्सव सोहळा ; शिवप्रेमींना विविध नाटक, व्याख्यान आणि पोवाड्यांची पर्वणी

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १९     

छत्रपती संभाजीनगर |  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिसादेवी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान पाच दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन शिवबा नगरी, पिसादेवी येथे सायंकाळी ७ ते १० वाजेदरम्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती पिसादेवी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली. यानिमित्त व्याख्यान, नाटक, पोवाडा, शिवगाथा, जागरण-गोंधळ यासह विविध कार्यक्रमांची पर्वणी शहरवासीयांना मिळणार आहे.

शिवजन्मोत्सव सोहळ्याचे हे सातवे वर्ष असून बुधवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता पिसादेवी येथे गावकरी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजपूजन करून या शिवजन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात करण्यात येणार आहे. या शिवजन्मोत्सव सोहळ्यात शिवप्रेमींना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी मिळणार असून नाटक, पोवाडा, शिवगाथा, जागरण-गोंधळ, बतावणी यासह महाराष्ट्रातील अस्सल मराठमोळ्या कला रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या शिवजन्मोत्सव सोहळ्यात पारंपरिक वेषभूषेत महिला, पुरुष, तरुण-तरुणी तसेच लहान मुलांचाही सहभाग राहणार आहे. नेपथ्य आणि महाराजांचे देखणे व्यक्तिमत्त्व यातून एका वेगळ्या स्वरूपात शहरवासीयांना हा शिवजन्मोत्सव सोहळा अनुभवता येणार आहे. हा देखणा व ऐतिहासिक शिवजन्मोत्सव जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमांनी आवर्जुन पाहावा, असे आवाहन पिसादेवी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!