घटनेतून आलेला ध्येयवाद जगण्याचा भाग व्हावा ; डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी आयोजित व्याख्यानात ई झेड खोब्रागडे यांचे प्रतिपादन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि.७ 

छत्रपती संभाजीनगर |  समता, बंधुता, स्वातंत्र्य व सामाजिक न्याय या चतुःसूत्रीवर भारतीय संविधानाने तमाम भारतीयांना एकसंध ठेवले आहे. घटनेतून पुढे आलेला सामाजिक समतेचा ध्येयवाद हा भारतीयाच्या जगण्याचा, विचार व्यवाहाराचा भाग झाला पाहिजे, हीच ,खरी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवारी (दि.सहा) समता शांती पदयात्रा, व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली नाटयगृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.मुस्तजिब खान, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रविकिरण सावंत , श्री.नितीन जाधव यांची मंचावर उपस्थिती होती . माजी सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे यांचे ’डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे संविधान’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी ते म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे ख-या अर्थाने आधुनिक भारताचे निर्माते आहेत. संविधान तयार करतांना त्यांनी सर्व समाजघटक, महिलांच्या कल्याणाचा विचार मांडला. जैविक, भाषिक, सांस्कृतिक बहुविविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंघ ठेवण्यात संविधानाचे महत्वाचे योगदान आहे. खरे तर बाबासाहेबांना घटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष करणे हे त्यांच्या अतिशय प्रग्ल्भ आणि सर्वांगीन बुध्दीमत्तेची प्रचिती देते. हे कार्य देश सेवेचे व्रत म्हणून त्यांनी स्वीकारले. प्रत्येक भारतीय हा संविधानाच्या तरतुदींचा लाभधारक आहे. त्यामुळे संविधान वापर सर्वांनी केले पाहिजे. संविधानाच्या अमृत महोत्सव ’घर-घर संविधान’ उपक्रम राबवून शासनाने साजरा करावा, असेही ते म्हणाले. सुमारे पाऊ तासांच्या भाषणात ई.झेड.खोब्रागडे यांनी विविध मुद्दे मांडले.  प्रारंभी प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांनी प्रास्ताविकातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश  टाकला. डॉ.पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन तर डॉ.मुस्तजिब खान यांनी आभार मानले.

बाबासाहेबांचे जीवन हाच संदेश : कुलगुरु…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे ख-या अर्थाने प्रखर राष्ट्रभक्त व संपुर्ण भारतीयांना जोडणारा दुवा होते. सामाजिक न्याय व संवैधानिक मुल्ये जतन करण्यासाठी त्यांचे संपुर्ण जीवन हाच खरा संदेश आहे, असे अध्यक्षीय समारोपात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले. बाबासाहेबांना अपेक्षित असलेले ’स्कुल ऑफ एंन्ट्रस्स इन पॉलिटिक्स’, भारतीय संविधान हा विषय सुरु करुन विद्यापीठाने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी अनेक लोकांना संघर्ष करावा लागला, प्राणत्याग करावा लागला. पण या महामानवाचे नाव मिळाल्यानंतर  विद्यापीठाकडे बघण्याचा दृष्टिकोण आणि अपेक्षा यात अमुलाग्र बदल झालेला आहे. या महामानवाच्या नावे असणाऱ्या विद्यापीठात काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य समझतो- मा. कुलगुरूबाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठाचे कुलगुरुपद भुषविण्यास मिळाले, आपले जीवन सार्थकी लागले, असेही डॉ.प्रमोद येवले म्हणाले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मा.ई.झेड.खोब्रागडे यांचे व्याख्यान झाले. यावेळी मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्यासह मान्यवर.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!